BANNER

The Janshakti News

शहरी बस सवलतीसाठी महिला ग्रामसभा घ्याव्यात..संदिप राजोबा



=====================================
=====================================

सांगली | दि.०१ एप्रिल २०२३

शहरी बस सेवेला महिलांना तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत दिली जात नाही.त्यामुळे शहरी बस सेवेसाठी महिलांना तिकीट दरात सवलत मिळावी. असा ठराव विशेष महिला ग्रामसभेमध्ये घेण्यात यावा.यासाठी प्रत्येक  गावामध्ये विशेष महिला ग्रामसभा पुढील आठ दिवसांमध्ये घेण्यात याव्यात असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केले आहे.


 सांगली शहर बस सेवा ही वीस किलोमीटर अंतरापर्यंत होते.ज्या गावांमध्ये सदरची बस सेवा सुरू आहे ती संपूर्ण गावी ही ग्रामीण आहेत केवळ शहरी बस या नावामुळे या ग्रामीण भागातील महिलांना तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत मिळत नाही.सदरची सवलत शहरी बसला ही लागू करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे सो यांना दिलेले आहे त्यावेळी त्यांच्याशी सकारात्मक चर्चा देखील झालेली आहे त्यावेळी सचिव साहेबांनी हा विषय महिलांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती देऊ असे सांगितले.

परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांना 50 टक्के तिकीट सवलदार मिळाली पाहिजे. अशी भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे. जोपर्यंत सवलत मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा थांबणार नाही.या लढ्याला बळ मिळावे यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये शहरी बसला नाही. 


त्यामुळे कसबे डिग्रज, कवठेपिरान दुधगाव समडोळी मौजे डिग्रज, मालगाव, म्हैशाळ गुंडेवाडी, लक्ष्मीवाडी,  वसगडे, खटाव, ब्राह्मणाळ, भिलवडी, अंकलखोप, माळवाडी, औदुंबर, धनगाव, बागणी, शिरोल, कुरुंदवाड, नरसिंहवाडी, शिरोळ या व इतर ग्रामीण भागातील गावांनी  ज्या ज्या गावांमध्ये शहरी बस सेवा सुरू आहे त्या गावच्या प्रत्येक ग्रामपंचायतीने येत्या आठ दिवसांमध्ये महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन याबाबतचा ठराव करावा.
सदरच्या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली एस टी विभागीय कार्यालय,  तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे पाठविण्यात यावी.सदरची सवलत मिळवण्यासाठी भविष्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठा लढा उभारणार असून या लढ्यामध्ये महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली पाहिजे. असे आवाहन संदीप  राजोबा यांनी केले आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆