BANNER

The Janshakti News

आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या हस्ते रामानंदनगर येथील श्री.संत सेना महाराज मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न







=====================================
=====================================

पलूस | दि. ०१ एप्रिल २०२३


पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील श्री.संत सेना महाराज मंदिर वास्तुशांती व मूर्ती प्रतिस्थापना सोहळा शुक्रवार दि.३१ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम , सौ.स्वप्नालीताई कदम आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र (आप्पा) लाड उपस्थित होते.


यावेळी भक्तीमय वातावरणात मान्यवरांच्या शुभहस्ते श्री.संत सेना महाराजांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली.
आमदार स्थानिक विकास निधी (७ लाख रु.) मधून श्री.संत सेना महाराज मंदिरा समोर बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी रामानंदनगरसह पलूस तालुक्यातील नाभिक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆