BANNER

The Janshakti News

विजापूर गुहागर महामार्गावरील रखडलेली कामे येत्या महिनाभरात पूर्ण करणार ; महामार्गाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांचे आश्वासन




=====================================
=====================================

कुंडल | ०३ एप्रिल २०२३

विजापूर गुहागर महामार्गावरील २२ पुलांची रखडलेली कामे येत्या महिनाभरात डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन महामार्गाचे उप अभियंता प्रकाश शेडेकर यांनी दिले. ते राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामासाठी आमदार अरुणअण्णा लाड यांनी त्यांना प्रत्यक्ष बोलवून ही कामे तात्काळ पूर्ण करण्यास सांगितले असता त्यांनी ही कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार लाड म्हणाले, विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग तुपारी फाट्यापासून ते तासगाव पर्यंत एकूण २२ ठिकाणी पुलांची कामे अपूर्ण आहेत, ज्या ठेकेदाराला या रस्त्याचे काम दिले होते त्याच्याकडून या पुलांची कामे पूर्ण न करता फक्त आत्ता लोकांची गैरसोय टाळण्यासाठी चांगल्या पद्धतीने डांबरीकरण केले जाणार आहे आणि पुन्हा निविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराला फक्त पुलांची कामे दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पण तोपर्यंत लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या पुलाच्या ठिकाणी डांबरीकरण केले जाणार आहे.

तसेच ज्या गावातून महामार्गावर येण्यासाठी छेद रस्ता आहे त्यांच्या उंची कमी करून ते ही डांबरीकरण केले जाणार आहे ही सर्व कामे येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे त्यामुळे नागरिकांची रस्त्याच्या त्रासातून बहुतांश मुक्तता होणार आहे.

तसेच विटा कुंडल या राज्य महामार्गावर साठेनगर येथे अपघातांचे प्रमाण वाढल्याने तेथे गतिरोधक करण्याची विनंती संबंधित महामार्ग विभागाला केली होती त्यानुसार या महामार्गाचे शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जी.आर.टेपाळे यांनी तात्काळ पाहणी करून तेथे गतिरोधक करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्थापत्य अभियंता महादेव माने, रवींद्रनाथ चौधरी, महामार्ग कनिष्ठ अभियंता पी.ए.रजपूत यांचेसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


विजापूर गुहागर मार्गावरील अडचणी सोडवण्यासाठी त्याची माहिती उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना देताना आमदार अरुणअण्णा लाड.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆






◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆