BANNER

The Janshakti News

जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमणी वाचवा उपक्रम राबविण्याचे प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांचे आवाहन..



=====================================
=====================================

अमरावती  ता.  अंजनगाव सुर्जी दि.१९ मार्च २०२३
------------------------------------------------------------------ 

  चिमणीचे अस्तित्व धोक्यात आहे ही वस्तुस्थिती आहे. मानवाची उत्क्रांती सुरू झाली तेव्हापासून चिमण्या माणसांच्या भोवताली राहत आहेत. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या घातक लहरी, पिकांवर कीटकनाशकांचा होणारा अतिवापर, सिमेंटची वाढती जंगले यामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
     उन्हाचे चटके जाणू लागले असून सोशल मीडियावर चिमणी पक्षांना पाणी व अन्न देण्याचे आवाहन केले जात आहे. '२० मार्च ॑ जागतिक चिमणी दिनानिमित्त प्रत्येक कुटुंबाने पक्षी वाचवा मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची गरज आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रत्येकाने आपल्या अंगणात, बाल्कनीत किंवा घराच्या गच्चीवर चिमण्यांन करिता दाणापाण्याची सोय करावी. कारण, पक्षी असो की प्राणी हे अन्नसाखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणे कठीण होईल. त्यामुळे जीवसृष्टी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांना वाचविणे गरजेचे आहे. अन्यथा भावी पिढीला पक्षी केवळ चित्रातच दाखवण्याची वेळ येऊ नये म्हणून 


सर्वांनी चिमणी वाचवण्याच्या अभियानात सहभागी होऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे आवाहन जागतिक चिमणी दिनाच्या निमित्त प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆