BANNER

The Janshakti News

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवणार : बार्टीचे नूतन महासंचालक सुनील वारे


सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सुनील वारेंची महासंचालक पदी नियुक्ती अभिमानास्पद : संदेश भंडारे 




=====================================
=====================================

तासगाव / प्रतिनिधी दि. 18 मार्च 2023
------------------------------------------------------------------
राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवणार असे प्रतिपादन बार्टीचे नूतन महासंचालक सुनील वारे यांनी केले.
राज्य शासनाने सांगली जिल्ह्याचे सुपुत्र भारतीय महसूल अधिकारी सुनील वारे यांची नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथे महासंचालक पदावर नियुक्ती केली. सांगली जिल्ह्याच्या वतीने रिपाईचे लोकसभा सांगली जिल्हाध्यक्ष तथा खा. रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष संदेश भंडारे यांनी महासंचालक सुनील वारे यांची भेट घेऊन सत्कार केला, सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आय आर एस अधिकारी सुनील वारे यांनी मानाचा तुरा खोचला असून त्यांच्या नव्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य कुटुंबातील वारे साहेबांनी मोठ्या पदावर जाऊन जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतमजूर शेतकऱ्यांच्या मुलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. लवकरच सांगली येथे महासंचालक सुनील वारे यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संदेश भंडारे यांनी दिली. राज्यातील रखडलेली विध्यार्थी स्कॉलरशिप, समाजकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजनांना विशेष निधी देऊन घरकुल योजना, संविधान भवन, ट्रॅक्टर वितरण योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणे, त्यांचे सांगली जिल्ह्यातील स्मारक यासह युवा बचत गट व बेरोजगार युवकांचे उद्योगाना गतिमान करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा रिपाईचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी जिल्ह्याच्या वेब साईट वर सांगली चे सुपुत्र असूनही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती दिली गेली नाही हे निदर्शनास आणून दिले, तसेच जिल्ह्यासाठी नवे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मंजूर करावे अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या कडे केली.
   यावेळी बार्टी येथील पत्रकार रामदास लोखंडे, प्रकल्प अधिकारी सुनंदा गायकवाड, प्रथमेश कांबळे, सरचिटणीस प्रविण मोरे, सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथे महासंचालक सुनील वारे यांचा सत्कार करताना रिपाईचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे व इतर मान्यवर
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆