स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई..
सांगली | दि. २० मार्च २०२३
------------------------------------------------------
दिनांक १७.०३.२०२३ रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास जत नगरपरिषदेचे भाजपाचे नगरसेवक विजय शिवाजी ताड वय ४२ रा. ताड मळा, जत ता. जत जि. सांगली हे त्यांचे इनोव्हा गाडी क्र एम.एच.१० सी.एन.०००२ या गाडीने त्यांच्या मुलांना शाळेतुन घरी आणणेसाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याचे साथीदार यांनी मोटरसायकल वरुन येवुन अज्ञात कारणावरुन नगरसेवक विजय शिवाजी ताड यांचेवर पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्याचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला होता.
विक्रम शिवाजी ताड वय ४२ वर्षे रा. ताड मळा जत यांनी दि. १७ - ०३ - २०२३ रोजी या घटने संदर्भात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना जत पोलीस ठाणे कडील विजय शिवाजी ताड यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या..
नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खुनाचा गुन्हयाच्या तपास कामी या चौघांना अटक केले असून हे चारही आरोपी पोलीसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली , उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे , पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे (जत) , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे , पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर , संदीप नलवडे, प्रकाश पाटील, मच्छिंद्र बर्डे , चेतन महाजन, प्रशांत माळी, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, नागेश खरात, दिपक गायकवाड, सुनिल लोखंडे, कुबेर खोत, सचिन धोत्रे, राजु मुळे, जितेंद्र जाधव, आमसिध्दा खोत, संदीप गुरव, अनिल कोळेकर, सागर लवटे, बिरोबा नरळे, सागर टिगरे, अच्युत सुर्यवंशी, राजु शिरोळर, संजय कांबळे, निलेश कदम, राहुल जाधव, सोहेल कार्तीयांनी , अमोल ऐदाळे, वैभव पाटील, उदयसिंह माळी निसार मुलाणी यांनी केली आहे.
या गुन्हयातील फरार आरोपी व सुत्रधार उमेश सावंत याचा शोध सुरु असुन गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली हे करीत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆