BANNER

The Janshakti News

प्राजक्ता कुलकर्णी यांचा नारीशक्ती पुरस्काराने गौरव



=====================================
=====================================

भिलवडी | दि. २१ मार्च २०२३
-------------------------------------------------------------------

भिलवडी ता.पलूस येथील ज्येष्ठ संगीत शिक्षिका सौ.प्राजक्ता प्रमोद कुलकर्णी यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आनंदगंगा फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने सौ.राजश्री पाटील नियंत्रक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या अध्यक्षतेखाली व पेठ वडगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानपत्र,शाल,श्रीफळ देऊन त्यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
प्राजक्ता कुलकर्णी या पंडित पांडुरंग बुवा गुळवणी यांच्या शिष्या असून त्या भिलवडी परिसरातील पहिल्याच संगीत विशारद आहेत.गेली एकतीस वर्षे सातत्याने संगीत व गायन सेवा करीत आहेत.विविध शाळा,महाविद्यालये,अध्यापक विद्यालयात त्यांनी संगीत शिक्षिका म्हणून काम केले आहे.उत्कृष्ट 
गायिका व हार्मोनियम वादक म्हणून त्या परिचित असून त्यांनी तीनशे हून अधिक विद्यार्थी हार्मोनियम वादन व गायन कलेमध्ये पारंगत केले आहेत.राज्यातील विविध आकाशवाणी रेडिओ केंद्रे व दूरदर्शन वरून त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.ग्रामीण भागातील महिलांना गायन,वादन,नृत्य ,तसेच भजन कला शिकवून त्यांनी कलेच्या प्रवाहात आणले आहे.त्यांनी संगीत क्षेत्रात निर्माण केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत त्यांचा नारीशक्ती सन्मानाने गौरव करण्यात आला आहे.


यावेळी आनंद गंगा फाऊंडेशन चे अध्यक्ष तानाजी पवार,सचिव सौ.वासंती पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या या गौरवाबद्दल भिलवडी व परिसरातील नागरिक व संगीत प्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆