BANNER

The Janshakti News

राष्ट्रीय महिला आदर्श गौरव पुरस्कार 2023 "

           राष्ट्रीय महिला आदर्श गौरव  

                  पुरस्कार  2023          


==============================
=====================================

सांगली | दि. २२ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------


"आदर्श  फाउंडेशन  सांगली" यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श माता , आदर्श गृहिणी , आदर्श महिला व्यवसाय , शैक्षणिक , सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा, वैद्यकीय, कला, साहित्य,कृषी इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 33 महिलांचा  ट्रॉफी,सन्मानपत्र,शाल,कोल्हापूरी फेटा देऊन पुरस्कार वितरण सोहळा फौंडेशनचे संस्थापक/ अध्यक्ष श्री.खंडेराव ठोंबरे (सर ) डाॅ.लताताई देशपांडे.वुमेन एज्युकेशन सोसायटी, जेष्ठ शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या.   प्राध्यापिका  मनीषा पाटील मॅडम  महाराष्ट्र राज्य अभ्यास मंडळ ,पुणे ,प्राथमिक विभाग  प्रमुख ,भिलवडी शिक्षण संस्था .
सौ.विजयामाला खरात मॅडम ,महिला व बालविकास अधिकारी सांगली याच्या उपस्थितीत माळी गार्डन हॉल येथे रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी  संपन्न झाला.




प्राध्यापिका पाटील मॅडमनी आपल्या मनोगततून आजची महिला कशी असावी यावर मार्मिक प्रबोधन केले.  
डॉक्टर देशपांडे मॅडमनी महिलांच्या वर होणारे अत्याचार याविषयावर मार्गदर्शन केले. 
सौ. खरात मॅडम यांनी जीवनात कसे यशस्वी व्हावे याबाबत मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमासाठी फौंडेशन उपाध्यक्ष,सचिव व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते. 
पुरस्कार प्राप्त महिलांनी कार्यक्रम कसा वाटला यावर  प्रतिक्रिया दिल्या व पुढील फौंडेशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.






संस्थापक ठोंबरे सर यांनी भविष्यात फौंडेशन कोणकोणते कार्यक्रम व महिलांना रोजगार,आर्थिक पुरवठा ,फौंडेशन सभासद,करियर विषयक मार्गदर्शन मोफत सेमिनार,स्पर्धा परीक्षा विषयी मोफत स्पर्धा केले जाणार आहे.   गेली तीन वर्षे फौंडेशन गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य करत आहे. भविष्यात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती संस्थापक यांनी दिली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆