BANNER

The Janshakti News

राष्ट्रीय आदर्श महिला गौरव पुरस्कार

=====================================
=====================================

भिलवडी | दि. 21 मार्च 2023
--------------------------------------------------------------------

जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श फौंडेशन सांगली यांच्या वतीने देण्यात आलेला राष्ट्रीय आदर्श महिला गौरव पुरस्कार सोहळा नुकताच सांगली येथे पार पडला.
 आदर्श फौंडेशन संस्थेच्या वतीने समाजाच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते.
माळवाडी ता.पलूस येथील सौ.स्मिता सचिन यादव , सौ.शुभांगी गणेश अवघडे व श्रीमती आशाताई गजानन मोहिते व श्रीमती हशिना जमील शेख यांना राष्ट्रीय आदर्श महिला गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.


    सौ.स्मिता सचिन यादव ह्या गेली अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना लोकहिताच्या अनेक उपक्रमांमध्ये त्या सहभागी असतात. त्यांच्या या कार्याबद्दल आदर्श फौंडेशन संस्थेच्या वतीने " समाजरत्न " पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.   सौ.शुभांगी गणेश अवघडे ह्या सद्या भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत अंकलखोप, नागठाणे , बुर्ली या ठिकाणी आशा गटप्रवर्तक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कोरोना काळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या या कार्याबद्दल आदर्श फौंडेशन संस्थेच्या वतीने " वैद्यसेविका पुरस्कार "  देऊन त्यांना गौरविण्यात आले.   श्रीमती आशाताई गजानन मोहिते ह्या माळवाडी गांवचे प्रमुख नेते व सामाजिक कार्यकर्ते स्व.गजानन मोहिते 
यांच्या पत्नी आहेत. गजानन मोहिते यांच्या पश्चात आशाताई ह्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी  अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. त्यांची मोठी मुलगी गायत्री हि BPED करत असून, तीने १६ वेळा राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळली आहे.
दुसरी मुलगी गौतमी हि BSC AGRI तिसरे वर्ष करत असून ती व्हॉलीबॉल ऑल इंडिया गोल्ड मेडेलिस्ट आहे.
तिसरी मुलगी गितांजली ११ वी सायन्स करत आहे. व ती हॉलीबॉल नॅशनल लेवला खेळली आहे.
  मुलगा ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे.
स्वता आशाताई नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. म्हणून त्यांना आदर्श फौंडेशन संस्थेच्या वतीने " आदर्श माता पुरस्कार " देऊन त्यांना गौरविण्यात आले.


श्रीमती हसीना जमील शेख यांनी नैसर्गिक आपत्ती महापूर व कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध संस्था कडून पूरग्रस्तांना आणि पूरग्रस्त शाळांना भरपूर प्रमाणात मदत मिळवून दिली आहे. महिला सबलीकरणासाठी उमेद अभियान अंतर्गत पलूस तालुक्यातील  माळवाडी गावच्या महिलांना बचतगट अंतर्गत व स्वता आर्थिक मदत करून व्यवसायात  विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महिलांना एकत्रित करून तनिष्क ग्रुप व महिला स्वयंसहायता गटातून विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून मार्गदर्शन करीत आहेत.शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करीता पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 
म्हणून त्यांना आदर्श फौंडेशन संस्थेच्या वतीने " शिक्षणरत्न " पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 पुरस्कार प्राप्त या चारही कर्तुत्ववान महिलांचं  सर्व स्तरातून  कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆◆◆●◆●◆●◆●