BANNER

The Janshakti News

महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात सांगलीचे नाव कोरणाऱ्या प्रतिक्षा बागडी हिचा सांगली जिल्हा गुरव समाजाच्या वतीने सत्कार





=====================================
=====================================

सांगली | दि.28 मार्च 2023

महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीमध्ये पार पडली. या स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील तुंग येथील प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली. आणि पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान प्रतिक्षाने मिळवला. या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास यावेळी चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.   




प्रतीक्षा बागडीच्या या विजयानंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
कु.प्रतिक्षा बागडी हिने "महिला महाराष्ट्र केसरी किताब पटकवण्याचा पहिला मान मिळाला. त्याबद्दल तिचा सांगली जिल्हा गुरव समाजाच्या वतीने  सत्कार करण्यात आला.




 यावेळी निवास (आप्पा) गुरव भिलवडी (भुवनेश्वरवाडी) , प्रताप गुरव कवठे पिरान , बाबा गुरव तुंग , हरिदास गुरव मिरजवाडी , सचिन गुरव डीग्रज ,रोहित गुरव बुर्ली , पांडुरंग गुरव , राहूल गुरव गणेश गुरव , अनिल गुरव तुंग , सुखदेव गुरव कवठेपीरानं , सौ. स्वाती गुरव कवठेपीरानं ,सौ. दीपा गुरव तुंग आदी गुरव बांधव भगिनी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆