=====================================
=====================================
भिलवडी | दि.२४ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------
श्री स्वामी समर्थ महाराजांचा 167 वा प्रकट दिन गुरुवार, दि. 23 मार्च रोजी
भिलवडी येथील सेवा केंद्रांत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वामी महाराजांच्या प्रगटदिना निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थित सेवेकरी यांना श्री धोतरे काका यांनी सर्व विभाग वर मार्गदर्शन व प्रश्र्नोत्तरांचे सेवा रूजू केली आणि या वेळी उपस्थित सेवेकरी यांनी आपल्या या स्वामी समर्थ सेवा मार्गात आलेले अनुभव व अनुभूती सांगितले. यानंतर मांदियाळी पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आशा पद्धतीने आगदी उत्साहपूर्ण वातावरणात स्वामी महाराजांचा प्रगटदिन सप्ंन्न झाला.
दरम्यान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालविकास दिंडोरी प्रणित केंद्र खंडोबाचीवाडी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्रिकाळ आरतीसह श्री स्वामी चरित्र सारामृत.दुर्गा शप्तशती पाठ वाचन करून नंतर मांदियाळी पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.व सायंकाळी ४:०० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची गावामधून टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व ६:०० वाजता महाआरती करण्यात आली.यावेळी खंडोबाचीवाडीसह परीसरातील भाविक भक्तांनी स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆