BANNER

The Janshakti News

शरद लाड यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते सत्कार



======================================
======================================

कुंडल | दि.२४ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------
पलूस तालुक्यातील क्षय रोग्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड धावून गेले आणि त्यांच्या सकस आहाराची जबाबदारी स्वीकारून नैतिक बांधिलकी जपली म्हणून जागतिक क्षय रोग दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करणेत आला.

तालुक्यात क्षय रोग तोंड वर काढत असताना त्यावर शासकीय आणि खासगी पातळीवर योग्य उपचार सुरूच आहेत पण त्यांना सकस आहाराने काही अंशी दिलासा मिळू शकत असल्याने तालुक्यातील ८५ क्षय रुग्णांच्या सकस आहाराची जबाबदारी शरद लाड यांनी स्वीकारली आणि तसे किट तयार करून प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरवले. तसेच या आजारावर आवश्यक असणाऱ्या औषधे ही कमी पडू न देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कोरोना काळात ही नागरिकांची सर्व जबाबदारी क्रांती कुटुंबाने घेतली होती. आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या फंडातून अनेक वैद्यकीय सुविधा पाचही जिल्ह्यात पुरवल्या होत्या. क्रांती कुटुंब पलूस आणि कडेगाव तालुक्यावर कसलेही संकट आले तरी धावून जात असल्याने या शरद लाड यांच्या कृतीने त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.



जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग मुक्तीसाठी धावून आलेल्या शरद लाड यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆