BANNER

The Janshakti News

विधवा महिलांना ही सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, त्या कुटुंबाचा आधारच असतात : धनश्रीताई शरद लाड

क्रांती महिला प्रतिष्ठान मार्फत अनोख्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम


======================================
======================================

कुंडल | दि.०९ फेब्रुवारी २०२३

बदलत्या काळात जर सगळीकडे विधवा महिला चालत असेल तर मग, हळदी कुंकवाला का चालत नाही?
तिला ही कुटुंबात सन्मान मिळायला हवा यासाठी क्रांती महिला प्रतिष्ठान सदैव तत्पर असेल असे प्रतिपादन क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड यांनी केले.

त्या कुंडल (ता पलूस) येथे क्रांती महिला प्रतिष्ठान मार्फत अनोख्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी प्रतिष्ठान मार्फत विधवांनाही सौभाग्याचं वाण देऊन हळदी-कुंकू लावण्यात आले.

धनश्रीताई लाड म्हणाल्या, विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून आपण नेहमीच प्रयत्न करतो ईथुनपुढेही यासाठी तत्पर असू कारण पूर्वीच्याकाळी एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा घराचा भार हीच महिला सोसत होती, यांच्यामुळेच घराला घरपण होतं, मग आता का या महिलांना वेगळं गणलं जातंय? कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणांसाठी स्वतःला झिजवणारी महिला जेव्हा विधवा होते तेव्हा ती का चालत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापूंनी नेहमी कर्मकांडाचा विरोधच केला होता त्यामुळे त्यांचेच विचार नव्या पिढीसमोर आपण रुजवत आहोत. कोणत्याही महिलेने स्वतःला अबला समजू नका कारण कुटुंबाला सावरणारी ती महिला कधी मृदू तर कुटुंबाच्या रक्षणसाठी रणरागिणीही होते. बापूंनी महिला सबलीकरणासाठी केलेले प्रयत्न आजही आमदार अरुणअण्णा लाड सक्षमपणे पुढे नेतायत. महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी महिला आयटीआय सुरू केला, हजारो आशासेविकांची पायपीट कमी करण्यासाठी सायकीलींचे वाटप केले, त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून नेहमी मदत ही केली जाते याशिवाय महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेक उपक्रम राबवून महिलांना चूल आणि मूल यापासून स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी क्रांती प्रतिष्ठान नेहमी प्रयत्न करत आहे असेही त्या म्हणाल्या.

यावेळी हजारो महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला उपस्थिती लावली, विधवांना दिलेल्या सन्मानामुळे अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमाने क्रांती कुटुंब नेहमी सर्वसामान्यांसाठी तत्पर असल्याची भावना महिलांमधून व्यक्त होत होती.


विधवा महिलांना सौभाग्याचं लेणं देऊन त्यांचा सन्मान करताना क्रांती महिला प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मा.सौ.धनश्रीताई लाड.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●