BANNER

The Janshakti News

व्हेल माशाची उलटी (अंबरग्रिस) ची तस्करी करणारी टोळी जेरबंद..


पाच कोटी एकोणऐंशी लाख पंचवीस हजार दहा रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..
======================================
======================================सांगली | दि. ०९ फेब्रुवारी २०२३

व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळीचा शोध घेऊन जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. सलीम गुलाब पटेल वय वर्षे ४९ रा. खणभाग सय्यद अमीन रोड सांगली व अकबर याकुब शेख, वय वर्षे ५१, रा. मु.पो. पिंगोली, मुस्लीमवाडी, ता. कुडाल, जि. सिंधुदुर्ग असे गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.

गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली , अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल , यांनी सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या,
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सपोनि संदीप शिंदे व अमलदार यांचे पथक तयार करुन सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध माहिती घेत पेट्रोलिंग करीत असताना सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शामराव नगर सांगली मधील डॉ एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळ दोन इसम अंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये उच्च मागणी असलेले हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) विक्री करणे करीता घेवुन येणार आहेत अशी माहिती मिळाली. सपोनि संदीप शिंदे यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे शामराव नगर सांगली मधील डॉ एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळ सापळा लावुन वॉच करीत असताना एक पांढ-या रंगांच्या ॲक्टीव्हा दुचाकी वाहनावर एक इसम थांबलेला दिसला त्याच्याजवळ एक पांढ-या रंगांची बोलेरो पिकअप उभी असलेल्या वाहनातुन एक इसम पिवळसर रंगांचा बॉक्स घेवुन खाली उतरला, त्यांचा संशय आलेने त्या दोन्ही इसमांना पकडुन सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव सलीम गुलाब पटेल वय वर्षे ४९ रा. खणभाग , सय्यद अमीन रोड सांगली २) अकबर याकुब शेख, वय वर्षे ५१, रा. मु.पो. पिंगोली, मुस्लीमवाडी, ता. कुडाल, जि. सिंधुदुर्ग असे असल्याचे सांगितले. त्या दोन इसमांची वन विभागाकडील अधिकारी व उपस्थित असले पंचासमक्ष सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी अकबर याकुब शेख याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात पुठ्याच्या बॉक्स मध्ये पिवळसर तांबुस रंगांचे ओबड धोबड आयताकृती आकाराचे घट्ट पदार्थ असलेले ८ नग मिळुन आले. त्याबाबत अकबर याकुब शेख यास विचारले असता त्याने सांगितले की, हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असुन आमचा आणखी एक साथीदारा आचरा ता. मालवण जि. सिंधुदुर्ग याने विक्री करणे करीता दिला आहे तो सलीम गुलाब पटेल यांचे मध्यस्तीने विक्री करणे करीता घेवुन आलो असल्याचे सांगितले. या दोघांकडे मिळून आलेल्या पदार्थाची वन विभागाकडील अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करुन तो पदार्थ व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) असलेचे सांगुन त्यावर प्रतिबंधित असल्याचे सांगितले. त्याचबरोबर या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति किलो ०१ कोटी रुपये इतकी किमंत असल्याचे सांगितले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी अकबर याकुब शेख याचे कब्जातुन ५ किलो ७१० ग्रॅम वजनाचा अंदाजे किंमत ५,०५,५०,०१०/- रुपयाचा व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) व त्याचे कब्जात मिळाले २५०००/- हजार रुपये किंमतीचा ॲक्टीव्हा मोपेड गाडी ३,५०,०००/- रुपये किमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकुण ५,७९,२५,०१०/- रुपयाचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने सपोनि संदीप शिंदे यांनी जप्त करुन त्या दोघांचे विरुध्द सांगली शहर पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ कायदान्वये गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली ,
अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सपोनि संदीप शिंदे, पोउनि विशाल येळेकर
अच्युत सुर्यवंशी, जितेंद्र जाधव, राजु शिरोळकर, अमोल ऐदाळे, संदीप पाटील, संकेत मगदुम, राहुल जाधव, मच्छींद्र बर्डे, सागर टिंगरे, गौतम कांबळे, अजय चंदरे, संतोष गळवे, संकेत कानडे तसेच वन विभाग सांगली कडील युवराज पाटील
अजितकुमार पाटील, तुषार कोरे, सागर थोरवत
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●