BANNER

The Janshakti News

खानापूर तालुक्यातील कमळापूर येथे विद्युत महावितरण विरोधात संघर्ष पेटणार...

विटा येथील विद्युत महावितरण कार्यालयावर सोमवार
 दि. १३ रोजी शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा..


======================================


======================================

खानापूर | दि. 09 फेब्रुवारी 2023

खानापूर तालुक्यातील कमळापूर व परिसरातील शेतकऱ्यांना कोणत्याही पूर्व सूचना न देता महावितरण कंपनीने बेकायदेशीरपणे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडली आहेत, परिणामी शेतकऱ्यांची पाण्याविना सर्व शेतीपिके करपू लागली आहेत, सामान्य शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महावितरणच्या या मनमानी विरोधात आज कमळापूर येथे महावितरण संघर्ष समितीचे श्रीदास होनमाने, ॲड दिपक लाड, प्रमोद पाटील, बाबुराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कमळापूर ग्रामपंचायत येथे बैठक पार पडली. कमळापूर-आळसंद-भाळवणी बलवडी-जाधवनगर, खंबाळे व परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांचा सोमवार दि.१३ रोजी सकाळी अकरा वाजता विटा येथील छत्रपती शिवाजी चौक ते महावितरण कार्यालयअसा चालत शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा महावितरण विरोधात काढण्यात येणार असल्याचे ॲड दिपक लाड व श्री दास होनमाने यांनी सांगितले.मोर्चामध्ये कमळापूर-भाळवणी आळसंद-बलवडी,जाधवनगर-
खंबाळे व परिसरातील गावांमधून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती कमळापूर चे सरपंच जयकर शेठ साळुंखे यांनी सांगितले.


या बैठकीस कमळापूरचे सरपंच
जयकर शेठ साळुंखे, दशरथ साळुंखे ,अरविंद गायकवाड, मॅक्स महाराष्ट्राचे पत्रकार सागर गोतपागर,गणेश जाधव, अविनाश मोहिते
यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●