BANNER

The Janshakti News

संजिवनी सह.ग्रा.भांडारच्या नवीन वास्तुचा उद्घाटन सोहळा संपन्न..


सोसायटीच्या आजी-माजी चेअरमनच्या हस्ते उद्घाटन..


======================================
======================================

भिलवडी | दि. १८ फेब्रुवारी २०२३
--------------------------------------------------------------------

     माळवाडी ता.पलूस येथे आज दि. १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सोसायटीचे विद्यमान चेअरमन रमेश (अण्णा) भोकरे व माजी चेअरमन , भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक व्यंकोजी जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
   सोसायटीच्या मार्फत गले चाळीस वर्षांपासून सरकार मान्य स्वस्त भाव दुकान चालवले जात आहे. गावात सरकार मान्य स्वस्त भाव दुकान एकच आहे. आज रोजी गावामध्ये एकूण जवळपास नवशे इतकी राशनकार्ड धारकांची संख्या आहे. सोसायटी मार्फत ग्राहकांना शासन नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा पुरविली जात असून यासाठी सोसायटीचे चेअरमन ,सेक्रेटरी व संचालक सतत प्रयत्नशील असतात.


  सोसायटीच्या  स्वखर्चातून  बांधण्यात आलेली हि वास्तु  मुख्य चौकामधील बस स्टँड च्या पाठीमागील बाजूस आहे. सुसज्ज अशी बांधण्यात आलेल्या या वास्तूमुळे ग्राहकांना  सेवा चांगली मिळणार आहे.अशी माहिती सोसायटीचे चेअरमन रमेश (अण्णा)  भोकरे यांनी दिली आहे.


    या कार्यक्रमाच्या वेळी सोसायटीचे संचालक हनमंत कारंडे , मधुकर नलवडे , शिवाजी भोळे , आनंदराव गायकवाड , जयवंत माळी , सुनंदा साळुंखे , मदिना इनामदार , शकुंतला मोहिते , सेक्रेटरी अमोल चव्हाण , माजी पं.स.सदस्य आनंदराव माळी , विद्यमान उपसरपंच संजय काटकर , ग्रा.पं.चे माजी सरपंच जनार्दन साळुंखे , माजी पोलीस पाटील अशोक तावदर , युवा नेते प्रताप पुजारी , ग्रा.पं माजी सदस्य मनिश मोरे ,संदिप काटे , जवाहर पवार , रमेश मंमदापुरे , बाबासो कुरणे यांच्या सह आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

--------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●