BANNER

The Janshakti News

त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आयोजित मालगाव येथील महिला मेळावा उत्साहात साजरा...




======================================
======================================

सांगली दि.५ : त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मालगाव येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आयु. एस. के. भंडारे, महिला प्रशिक्षण प्रमुख आयु. नि. सुषमताई पवार, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख आयु. एस. एस. वानखडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. भिकाजी कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष आयु. रुपेश तामगावकर, महिला उपाध्यक्ष सांगली आयु. नि. कमलताई खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.
आयु. भंडारे म्हणाले, स्त्रीला भारतीय संविधानाने स्वांतत्र्य, समतेने जगण्याचा अधिकार दिला.


आयु.नि. सूषमाताई पवार म्हणाल्या, आजच्या स्त्रीने रमाई चा आदर्श घेऊन आपले जीवन जगले पाहिजे व आदर्श समाज निर्माण केला पाहिजे. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष आयु. रुपेश 
तामगावकर यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून घेतली.केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख आयु. एस.एस. वानखडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. भिकाजी कांबळे यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆


■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆