=====================================
=====================================
मिरज दि. ५ : जगातील कोणताही धर्म हा मानवासाठीच असून मानवांच्या सर्वांगीण कल्याणासाठी धर्माने आपली भूमिका बजावली पाहिजे अशी शिकवण त्या धर्मात असायला हवी असे संत रोहिदासाना मान्य होते.
इतकच नव्हे तर त्यानी मूर्ती पूजेसारख्या कर्मकांडावर कधीही विश्वास ठेवला नव्हता मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा लावणे हेच सर्व सुखाचे उगमस्थान असल्याची धारणा संत रोहिदासांची होती असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले ते मिरज (इंदिरानगर) येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या संत रोहिदास महाराजांचे जयंती निमित्त बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक शशिकांत कांबळे यांनी केले.यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे, राज्य उपाध्यक्षा सुनीता खटावकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नयना लोंढे, जिल्हाध्यक्षा वनिता सोनवले, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा साबेरा इंगळे, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, मिरज तालुका अध्यक्ष अनिल देवकुळे, शहर जिल्हाध्यक्षा शीला बनसोडे, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष मल्हारी चव्हाण, मिरज शहराध्यक्षा महेक निशानदार, रेणुका नाईक, मेघा चव्हाण, चांदणी उपाध्ये, शहनाज जमादार,प्रवीण भंडारे सुरेश वाघमारे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिरज (इंदिरानगर ) येथे संत रोहिदास महाराज यांचे जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे, राजू दादा घाटगे, मल्हारी चव्हाण सुनीता खटावकर, सर्जेराव भंडारे व इतर
■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■
■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■