BANNER

The Janshakti News

वालनेस हॉस्पिटल मधील मृत कामगार शरद भोरे यांच्या कुटुंबाला तातडीने ५० लाखाची आर्थिक मदत द्या.. ...सेवक आरोग्य कामगार संघटनेची मागणी





=====================================
=====================================

मिरज | दि.०७ फेब्रुवारी २०२३

वालनेस हॉस्पिटल मिरज येथे गेले ८८ दिवसा पासून कामगार आपल्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत. पण येथील सुस्त व्यवस्थापकीय प्रशासन आंदोलन सुरू असले पासून कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, कामगार बंधू आपल्या न्याय हक्कासाठी वोलनेस हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत चर्चेला तयार असताना सुद्धा हे प्रशासन सुस्त बसून आहे. यांना कोणत्याही प्रकारे कामगारांच्या सुखदुःखाची घेणेदेणे नाही कामगारांना जगण्याचा अधिकार नाही का ? त्यांना मुलाबाळांना शिक्षणाचा अथवा सर्वसामान्यासारखा जीवन जगण्याचा अधिकार त्यांना दिसून येत नाही किंवा हे प्रशासन त्यांना देऊ इच्छित नाही अशा ह्या प्रशासनामुळे कित्येक तरी कामगारांचे घर देशी धोडीला लागण्याची शक्यता आहे व लागत आहेत आणि याचाच सर्वात पहिलं आणि हे सर्वात मोठा परिणाम दिसून आला की शरद भोरे हे ताण तणावाखाली जाऊन त्यांनी आपले आयुष्य अर्ध्यावर सोडून आपलं घर कुटुंब सोडून गेल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे. कामगारांनी आपला घर खर्च चालवण्यासाठी अनेकांच्याकडून उधारी, प्रसंगी कर्ज घेतलेले आहेत घर संसार चालवण्यासाठी दर महिन्याला येणारा खर्च हा कुठून आणावा कारण हाताचे काम आणि मिळणारे वेतन हे दोन्ही थांबलेले आहेत पण त्यांच्या मुलाबाळांचं काय आई-वडिलांचे औषध उपचार कसा करायचा आजारपणाला पैसे कुठनं आणायचे व घरचा खर्च कसा चालवायचा या संपूर्ण गोष्टींचा विचार त्यांच्या परिवाराला पडला आहे. अगदी तरुण वयामध्ये आमचे कामगार बंधू शरद भोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले या निधनाला कारणीभूत वॉलनेस हॉस्पिटलचा पूर्ण प्रशासन आहे या  मृत शरद भोरे यांना शासनाकडून तातडीने 50 लाख रुपयांची मदत मिळावी व कामगारांच्या घरातील एक व्यक्ती कायमस्वरूपी शासकीय किंवा वालनेसच्या रुग्णालयामध्ये कामाला घ्यावे म्हणजे त्याचं कुटुंबाचा पुन्हा पुनर्वसन होईल अशी कळकळीची मागणी सेवक आरोग्य कामगार संघटनेकडून करण्यात आली. 

यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल मोरे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, संजय कांबळे,सागर आठवले, सचिन कांबळे, शुभम वावरे, आदि मान्यवर उपस्थित होते.

■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■


■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■