BANNER

The Janshakti News

गट नेते शरद लाड यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून कार्यकर्त्यांनी पाडला नवा पायंडा.

पलूस कडेगाव तालुक्यातून तब्बल दीड हजार सायकली जमा केल्या.


======================================

info.thejanshaktinews@gmail.com

======================================

कुंडल | दि. १६ फेब्रुवारी २०२३

दोन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबवण्यासाठी शरद लाड यांचा वाढदिवस कोणत्याही डामडोल शिवाय गरजू विद्यार्थ्यांना सायकली देऊन साजरा करण्याचा संकल्प सोडला होता त्यादृष्टीने अनावश्यक खर्चाला फाटा देत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमाला साथ देत आज वाढदिवसानिमित्त प्रतिकात्मक सायकल भेट दिली. शिक्षणापासून दुरावणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा जवळ करण्यासाठीच्या उपक्रमाला भरगोस प्रतिसाद तर मिळालाच शिवाय शरद लाड यांना शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही तालुक्यातून कार्यकर्त्यांची दिवसभर लगबग होती.

सकाळी शरदभाऊ लाड यांनी क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या समाधीचे दर्शन घेऊन घरगुती स्वरूपात औक्षण करण्यात आले.

यावेळी प्रत्यक्ष भेटून सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, महिला अध्यक्षा सुश्मिता जाधव(इस्लामपूर), माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, संग्राम उद्योगसमूह प्रमुख निलेश येसुगडे, कपिल गायकवाड, दिलीप जाधव, शेतकरी संघटनेचे सूर्यकांत मोरे, आत्माराम हारुगडे, तृप्ती चिटणीस, श्रीकांत लाड, रोहन थोरात(इंदापूर), आळसंद सरपंच अभिनंदन जाधव, अविनाश कारंडे, शिवाजी केसकर, कोंडीराम जाधव(आंधळी), वैशाली मोहिते, रमेश व्हनकंडे, शामराव वागावकर, टी. एम.जाधव(आसद), जनार्दन पाटील(मोराळे), सुरेश शिंदे, गोरख सूर्यवंशी(सांडगेवाडी), नंदा पाटील, जगन्नाथ आवटे, कुंडलिक एडके, किशोर माळी, पी.एस.माळी, वसगडे माजी सरपंच श्रेणीक पाटील, पिंटू मोरे(पलूस), धन्यकुमार पाटील, राजाराम जाधव, सावंतपूर उपसरपंच विकास जाधव, ग्राम पंचायत सदस्य भरत घाडगे, सुकुमार पाटील(तुपारी), कृष्णत पाटील(खटाव उपसरपंच), संदीप काटकर(कडेगाव नगरसेवक), कॉन्ट्रॅक्टर व्ही.डी.वाजे, सुरेश शिंगटे, विजय मोहिते, विराज पवार, सिकंदर मुल्ला, जोतिराम सावंत, मारुती सूर्यवंशी(बलवडी), अजित मुळीक(नेर्ली), उद्योजक कुमार डाळे, अरविंद मदने(बांबवडे सरपंच), सोमनाथ बाबर (उपसरपंच येडे उपाळे), सुरेश पाटील(उपसरपंच सासपडे)संभाजी पाटील (उपसरपंच उपाळे वांगी), मारुती शिरतोडे, रमेश एडके, रामभाऊ देशमुख(वांगी), वैभव पवार(चिंचणी), बाबुराव पाटील(पुनदी) यांनी शुभेच्छा दिल्या.

तर भ्रमनध्वनीवरून माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम, प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, पुण्याच्या माजी महिलाध्यक्ष स्वाती पोकळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


गटनेते शरद लाड यांना 1500 सायकीलींचे प्रतिकात्मक भेट जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक विरूपाक्ष लुपणे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, राजेंद्र लाड, क्रांतीचे उपाध्यक्ष उमेश जोशी, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, संचालक शीतल बिरनाळे, संदीप पवार, जयप्रकाश साळुंखे, अरविंद कदम, अंकुश यादव आदी.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆