BANNER

The Janshakti News

शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठानचे याही वर्षी शिवजयंतीचे दिमाखात आयोजन..



======================================
======================================

कुंडल | दि. १७ फेब्रुवारी २०२३
--------------------------------------------------------------------

कुंडल (ता पलूस) येथील मानाची समजली जाणारी शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठानची छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचे याही वर्षी दिमाखात आयोजन व नियोजन करणेत आले आहे.

यंदा किल्ले सिंधुदुर्ग येथून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ज्योत आणण्याचे नियोजन आहे या ज्योतीचे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता बस स्थानकावर स्वागत होणार आहे. 8 वाजता महाराजांची मूर्ती वाजत गाजत शिवतीर्थ स्थळी आणली जाईल आणि प्रतिष्ठापना केली जाईल. सायंकाळी 4 वाजता साहसी मैदानी खेळांचे आयोजन उभा केलेल्या भव्य शामियान्या समोर होईल आणि 6 वाजता शिवजन्म पाळणा सोहळा संपन्न होईल रात्री महाआरती केली जाईल. दुसऱ्या दिवशी दि 20 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवाद्य संगीतामध्ये भव्य मिरवणूक गावातुन ढोल-ताषा, हालगी, मर्दानी खेळ, भव्य आतिशबाजी, विद्युत दिव्यांच्या झगमगाटात सुरु होईल.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदभाऊ लाड यांनी पत्रकार परीषदेत दिली. तसेच कुंडल आणि परिसरातील सर्व शिवभक्तांनी या दिमाखदार सोहळ्या मधे उत्स्फुर्त सहभाग घ्यावा आणि या दोन्ही दिवसाच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन ही प्रतिष्ठान तर्फे करणेत आले आहे.

                      खास आकर्षण

कुंडल (ता पलूस) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठान मार्फत उभा केलेला भव्य शामियाना.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●