BANNER

The Janshakti News

ऊसावर केलेला प्रयोग कांद्यावरही लागू झाला ; कांदा बनला चक्क 750 ते 800 ग्रॅम वजनाचा..




======================================
======================================

ब्रम्हनाळ | दि.२५ फेब्रुवारी २०२३
--------------------------------------------------------------------

 ब्रम्हनाळ ता-पलूस मधील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेता मध्ये एका ओल्या कांद्याचे वजन सरासरी 750 ते 800 ग्रॅम एवढे भरले आहे.  शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या उसाची लागण असलेल्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती सध्या उसाची भरणी करण्याचे असल्यामुळे त्यांनी कांदा काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दहा-बारा कांदे असे मोठे निघाले त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले परंतु सरसकट कांदा  एकसारखाच दिसू लागला. त्यामुळे त्यांनी त्याचे वजन केले असता चक्क साडेसातशे ते आठशे ग्रॅम पर्यंत वजन भरू लागले.



 ज्यावेळी ही बातमी गावकऱ्यांना कळाली त्यावेळेस कांदा पाहताना सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असता त्यांनी स्थानिक बाजारपेठेतूनच कांद्याचे तरु(रोपे) आणले होते व उसाच्या लागणीमध्ये आंतरपीक म्हणून केलेले होते. त्यांना वेळो वेळी मार्गदर्शन कुलभूषण हिंगणे यांनी केले अंतर पिक असले मुळे सुरवातीला उसा सोबतच  12:61:00 अळवणी दोन वेळा व ह्युमिक व फुलविक ऑसिड तसेच सिव्हिड ची फवारणी दोन वेळा घेतली होती. उसासाठी केलेला प्रयोग हा कांद्यासाठी सुद्धा यशस्वी लागू झाला असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले , ऊस सुद्धा सध्या जोमात आहे. 



त्यांनी केलेल्या या प्रयोगाबद्दल व कांद्याच्या घेतलेल्या उत्पन्नाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदिप राजोबा यांनी त्यांचा सत्कार केला शिरगावे यांनी घेतलेल्या या उत्पादना बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆





◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆●◆●◆●◆●◆●◆●