=====================================
=====================================
पलूस | दि.२४ फेब्रुवारी २०२३
-------------------------------------------------------------------
कमळापूर ता.पलूस येथील आळसंद गावच्या सीमेवर असणाऱ्या ऊस शेतीमध्ये बिबट्याचे मागील काही दिवसापासून दर्शन घडत आहे. यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील चार-पाच दिवसापासून या बिबट्याचा वावर या परिसरामध्ये दिसत आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांच्याकडून समजते. बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावला जात नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांच्या मधून संताप व्यक्त होत आहे असे ॲड दिपक लाड यांनी कळविले. बिबट्या सध्या असणाऱ्या ठिकाणापासून कमळापूर, आळसंद, भाळवणी, बलवडी
ही गावे थोड्याच अंतरावर आहेत
जर का बिबट्या मनुष्यवस्तीत घुसला तर जीवितहानी घडून परिस्थिती गंभीर होऊ शकते.
यासाठी वन खात्याने सांगली येथील वाईल्ड लाईफ संघटनांची मदत घ्यावी व बिबट्यास जेरबंद करावे..
या संस्थेने सांगली येथील बिबट्यास जेरबंद करण्यामध्ये मोठी कामगिरी बजावली होती, तसेच कुंडल येथे विहिरीत पडलेले सांबर बाहेर काढण्यामध्ये मदत केली होती.
या अनुषंगाने कमळापूर आळसंद सिमेवर निदर्शनास आलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अजित पाटील उर्फ पापा पाटील,अजितकुमार पाटील मानद वन्यजीव रक्षक, सांगली व प्राणी मित्र संघटनांशी संपर्क साधणार असल्याचे ॲड लाड यांनी सांगितले.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆