BANNER

The Janshakti News

VBA आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

==============================
======================================

मिरज | दि. २६ फेब्रुवारी २०२३

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरज येथील कृष्णा घाट रोड, लक्ष्मी देवालयाच्या सभा मंडपात भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. आरोग्य शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हासंघटक रहीम कवठेकर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. महावीर कांबळे, बाळासाहेब कांबळे, दिपाली वाघमारे आदींनी केले. या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. विशाल गोपी व त्यांचे सहकारी नावीत मुल्ला यांनी सहकार्य केले तर अरिन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मिरजचे डॉ. मीनाक्षी शेंगोशी, डॉ. किरण अजूर यांंनी शिबिरास सहकार्य केले.


या कार्यक्रमाचे संयोजन वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार, परमव्हेज इनामदार,मोहम्मद सनदी यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केले होते.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆