BANNER

The Janshakti News

डी.पी.आय पक्षाचा पुन्हा आक्रमक यलगार.. ....अशोकराव वायदंडे
=====================================
=====================================

सांगली | दि. २१ जानेवारी २०२३

सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये प्रचंड असा घोटाळा करण्यात आला आहे . 

 अनेक वेळा जिल्हाधिकारी मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे तक्रार करून सुद्धा चौकशी झालेली नाही. तरी सरपंच ग्रामसेवक यांची चौकशी व्हावी या मागणीसाठी डी.पी.आय पक्षाच्या वतीने  २६ जानेवारी २०२३ पासुन जिल्हाभर आंदोलन करण्यात येणार आहे. 

 सांगली जिल्ह्यातील  इस्लामपूर येथील गटविकास अधिकारी कार्यालयापासून आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

दलित वस्ती सुधार योजनेतील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत, परंतु शासन व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे म्हणूनच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांना भेटून डी.पी.आय पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. 

अशी माहिती अशोकराव वायदंडे (जहाल नेते) डी.पी.आय. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

▪️अशोकराव वायदंडे (जहाल नेते) डी.पी.आय.
▪️नंदकुमार नांगरे.(प्रदेश उपाध्यक्ष)डी.पी.आय 
▪️दिलीप कुरणे (राज्य संघटक)डी.पी.आय
▪️सतिश लोंढे.(पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष) डी.पी.आय.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆