BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला देशातील " सर्वोकृष्ठ सहकारी साखर कारखाना " पुरस्कार...... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे " पुरस्कार " प्रदान..




======================================
======================================

कुंडल : दि.२१ क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांचा देशातील " सर्वोकृष्ठ सहकारी साखर कारखाना " पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे प्रदान करणेत आला, हा पुरस्कार आमदार अजित पवार, आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार दिलीप वळसे पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत


 कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण (अण्णा) लाड , उपाध्यक्ष उमेश जोशी , क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड , उद्योजक उदय लाड , जिल्हा परिषद सदस्य शरद लाड , कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे आणि संचालक मंडळाने स्वीकारला.



क्रांती कारखान्याचा देश पातळीवरील हा पुरस्कार 2021-22 सालात उच्च साखर उतारा विभागात कारखान्याने केलेले कार्यक्षमरित्त्या तांत्रिक कार्य, काटेकोर आर्थिक नियोजन आणि ऊस विकासात केलेल्या भरीव कामामुळे देणेत आला.

कारखान्याने मागील गळीत हंगामात साखरेची गुणवत्ता चांगली ठेवत पाणी, वाफ आणि वीज यांची बचत करून प्रदूषण नियंत्रित केले, पाण्याचा योग्य वापर करून सांडपाणी उत्सर्जन कमी केले, पुरेसे मनुष्यबळ वापरत पर्यावरण व्यवस्थापन केले, औद्योगिक सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर, कार्यक्षेत्रामध्ये पीक फेरपालट व सेंद्रिय कर्ब वाढीसाठी काटेकोर नियोजन, कार्यक्षेत्रात सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन दिल्याने पुरस्कार प्रदान करणेत आला.

या पुरस्काराबरोबरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचा वैयक्तिक विभागातून सर्वोकृष्ठ पर्यावरण पुरस्कार उक्तृष्ठ आसवणी व्यवस्थापक पुरस्कार कारखान्याचे आसवणी व्यवस्थापक अनिल शिंदे यांना दिला.

क्रांती कारखाना क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या विचाराने चालू आहे, कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न घेणेसाठी उचललेले पाऊल, तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याने हा कारखाना अल्पावधीत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे.

शेतकऱ्यांचे ऊसाचे देणे देऊन, बँकांची देणी वेळेत दिल्याने देय व्याजात भरीव बचत केली आहे, अशा अनेक वैशिठ्यांमुळे कारखान्याला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

यावेळी कुंडलिक एडके, कुंडलिक थोरात, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, श्रीकांत लाड, मुकुंद जोशी, ऍड.सतीश चौगुले, अंकुश यादव, आप्पासाहेब जाधव, अरुण कदम, संपतराव सावंत, नारायण जगदाळे, जयप्रकाश साळुंखे ,दिलीपभाऊ लाड यांचेसह कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆