BANNER

The Janshakti News

साखर कारखान्यांचे मळीमिश्रीत , केमिकल युक्त पाणी नागठाणे येथील ओढ्यातून कृष्णा नदी पात्रात ; नदी पात्रातील जलचर प्राण्यांना व नागरिकांच्या आरोग्यास धोका..

======================================
======================================

नागठाणे | दि. २० जानेवारी २०२३

मौजे नागठाणे ता.पलूस येथे कृष्णा नदी पात्रामध्ये साखर कारखान्यांचे मळीमिश्रीत , केमिकल युक्त पाणी मिसळत असल्याने नदी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दुषित झाले आहे. 
  नदीपात्रातील जलचरांना धोका पोहचला असून नदी पात्रातील मासे मोठ्या प्रमाणावर मृत होत आहेत. 
    मळीमिश्रीत , केमिकल युक्त पाणी नदी पात्रात मिसळणे हा प्रकार वारंवार घडत आहे. प्रसिद्धी माध्यमातून या संदर्भातील अनेक वेळा बातम्या देखील आल्या आहेत.
 दुषित पाण्यामुळे नदी पात्रातील जलचर प्राण्यांचा व नदीकाठावरील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून देखील  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गांधारीची भूमिका घेवून गप्प आहेत.


साखर कारखान्याची मळी व केमिकल युक्त दुषित पाणी नागठाणे ओढा पात्रामधून कृष्णा नदी पात्रामध्ये  मिसळत असून या दुषित पाण्यामुळे सदर ओढा पात्राच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास मोठ्‌या प्रमाणात नागरिकांना सहन करावा लागत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली विभागाचे दुर्लक्ष असून.. 


संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष पहाणी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळ, सांगली या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव भ. वि आघाडी श्री. जयवंतराव मदने यांनी पत्रकार परिषदे मध्ये केले. 


नागठाणे ग्रामपंचायतीचे मुख्य अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग, सांगली यांना लेखी पत्र...

योग्य ती कारवाई करण्याची मागणी..

मौजे नागठाणे येथील ओढा पात्रामधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण युक्त पाणी कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. नदी पात्रातील दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन साथीचे आजार पसरण्याचा संभव असल्याने आपल्या मार्फत  गंभीरतेने विचार होऊन योग्य ती कार्यवाही व्हावी असे लेखी पत्र नागठाणे ग्रामपंचायत कडून मुख्य अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग, सांगली यांना देण्यात आले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆