BANNER

The Janshakti News

गोळवाडी येथील शाळकरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल... निसर्गरम्य वातावरणाचा विद्यार्थांनी घेतला पुरेपूर आनंद ..




=====================================
=====================================

वैजापूर दि. १९ जानेवारी २०२३

(विशेष प्रतिनिधी: अकील काजी वैजापूर)

         वैजापूर तालुक्यातील गोळवाडी गाव, येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची शैक्षणिक व नैसर्गिक सहल काढण्यात आली.
          ही सहल जवळचं असलेल्या जुने गोळवाडी गावाच्या जवळच असणाऱ्या नदीकाठी गावचे ग्रामदैवत  गवळी बाबा देवस्थान या ठिकाणी नेण्यात आली होती.

गोळवाडी गावचे ग्रामदैवत  गवळी बाबा देवस्थान यांच्या प्रांगणामध्ये ही सहल निसर्गरम्य वातावरणात धुंद होऊन गेली.
विद्यार्थ्यांनी या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला.
       यावेळी केंद्र प्रमुख मा. शेळके सर यांनी  विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
        शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पक्षी-प्राण्यांचा आवाज मोबाईलद्वारे स्पीकर मध्ये ऐकवले व त्यांच्या जीवनावर माहिती सांगितली.
        विद्यार्थ्यांनी नाटक,वेगवेगळ्या  
गोष्टी-गप्पा,गाण्यावरती नृत्य सादर करून खूप-खुप धम्माल आणी मज्जा केली. विविध  प्राण्यांची आवाज काढणे त्यांची नक्कल करणे व त्यांच्या बद्दल माहिती जाणून घेतली.
          गावातील नव-निर्वाचित सरपंच भाऊसाहेब पाटील शिंदे (तात्या)
यांनी मुलांना खाऊचे पॉकेट आणी बिस्किटे वाटप केले,तसेच शुद्ध फिल्टर पाण्याची व्यवस्था ही केली..



      दुपारंच जेवण मुलांनी व शिक्षकांनी एकत्रित एकमेकांचे डबे शेअर करून केले..
            जेवणानंतर विश्रांती घेऊन विद्यार्थायांनी बोर दहेगाव मध्यम प्रकल्प(धरण) पाहिला व तेथील पक्ष्यांचा आवाज धुंद होऊन ऐकला, प्रकल्पा बद्दल शिक्षकांनी मुलांना माहिती सांगितली. 
           यावेळी रामनगर (वस्ती शाळा) येथील शिक्षक रोठे सर व त्यांच्या विद्यार्थांनी ही या सहलीत सहभाग घेतला.. 



       यावेळी गावातील माजी सरपंच संदीप मगर,ग्रामसेवक सुनील जाधव साहेब,अब्बू पठाण, युवा नेतृत्व विक्रम पाटील शिंदे, जयराम धारबळे, अकील काजी, माधव रोठे,गहिनीनाथ वाघ, आदी उपस्थित होते.
              सहल यशस्वी करण्यासाठी शाळेतील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका डी.के मॅडम, शिक्षक आळंजकर सर,खरात सर, रोठे सर.      शिक्षिका पोतदार मॅडम,आहेर मॅडम,काळे मॅडम सर्व सहभागी होते..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆