BANNER

The Janshakti News

मोठी दुर्घटना ; बस चालकाचा निष्काळजीपणा ; ३८ भाविकांसह पंढरपूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस पलटी..



======================================
======================================
 
मंगळवेढा | दि. १९ जानेवारी २०२३

मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा इथे देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची खाजगी ट्रॅव्हल बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रामकुमारी भूपनसिंग गुर्जर (वय ६८,रा,मध्य प्रदेश) या वृद्ध महिला भविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याशिवाय ८ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. तर २९ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. आज बुधवारी सकाळी ६ वाजता हा अपघात झाला. जखमींना सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. सर्व प्रवाशी हे मध्य प्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भारत यात्रा करून पंढरपूरकडे जाताना बस पलटी भारत यात्रेसाठी मध्यप्रदेश येथील भाविकांची खाजगी ट्रॅव्हल बस कर्नाटक येथे देवदर्शन करून पंढरपूरकडे निघाली होती. उमदीहून मंगळवेढामार्गे पंढरपूरकडे जाताना येद्राव फाटा येथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे बस पलटी झाली. ट्रॅव्हल बस अतिवेगात होती तसंच ड्रायव्हर मोबाईलवर बोलत असल्याचं जखमी भाविकांनी यावेळी सांगितलं. घटनास्थळी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ भेट जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.


मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील भाविकांची ट्रॅव्हल बस भारत यात्रा करत असून कर्नाटक येथे देवदर्शन करून ते पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे बस येड्राव फाटा येथे आल्यावर ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाली. ड्रायव्हर मोबाईलवर बोलत असताना अतिवेगात असल्याची माहिती भाविकांनी दिली. गावातील स्थानिकांना ही घटना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत भाविकांना बाहेर काढलं
◆◆◆◆◆◆◆◆■■■■■◆◆◆◆◆◆◆◆◆■■■■■


◆◆◆◆◆◆◆◆■■■■■◆◆◆◆◆◆◆◆◆■■■■■