BANNER

The Janshakti News

रणसंग्रामचा महीला मेळावा उत्साहात...
====================================
====================================

कुंडल | दि.१८ जानेवारी २०२३

कुंडल (ता.पलूस) येथे दि. 16 जानेवारी 2023 रोजी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असलेल्या कुंडल येथील रणसंग्राम सोशल फाउंडेशनचा 13 वा वर्धापनदिन व या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला भव्य महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
 
 स्वाभिमानिच्या मुलुख मैदानी तोफ पुजाताई मोरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.साधना पवार, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा रोटे माई, लावणी नृत्यांगना चैत्राली पानसरे-म्हात्रे, वसुंधरा ग्रुप अनघा जाधव आणि सहकारी,रणसंग्राम चे ॲड.दिपक लाड , क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू भाई ॲड सुभाष बापू पाटील , 
जेष्ठ मार्गदर्शक पोपटराव सुर्यवंशी काका,स्वाभिमानीचे बाबुराव शिंदे आबा, बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे निवास भाऊ सांवत, अविनाश दादा मोहिते, निवेदक शिवाजी रावळ, विशाल कोंढाळकर,सुरज सोळवंडे यांच्या सह आदि मान्यवर या कार्यक्रमासाठी  उपस्थिती होते.


यावेळी बोलताना पुजाताई मोरे म्हणाल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभुमी, कर्मभुमीत मला येण्याच भाग्य मिळाले.पण नाना पाटील बीड मध्ये आमदार झाले होते. याच क्रांतिकारकांचा वारसा ॲड ‌दिपक दादा चालवत आहेत.असे त्या म्हणाल्या.

भाई मोहन गुंड म्हणाले संघर्षाचा वसा आणि वर्षा समर्थपणे पेलण्याचे काम ॲड दीपक लाड करत असल्याचे सांगितले.. तसेच विधवा महिलांना मानसन्मान देण्यासाठी आजपासून आपण सुरुवात करूया असे जाहीरपणे सांगितले.

ॲड मनिषा रोटे माई मार्गदर्शन करताना म्हणाल्या की कुंडल माझे माहेर आहे.आणि दिपक माझा मुलगा.. समाज सेवेत स्वताला झोकून देऊन रात्रंदिवस समाजासाठी धडपडणाऱ्या युवकाची फळी दिपकने उभा करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

डॉ.साधना पवार म्हणाल्या की स्त्रीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आरोग्याची काहीही तक्रार निर्माण झाल्यास तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घेणे गरजेचे आहे.अशातच महिलांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी रणसंग्रामच्या वतीने महिलांच्या साठी कार्यक्रम घेवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करत असते.

डॉ साधना पवार यांनी ॲड दिपक लाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव जाहीरपणे सांगत असताना ॲड दिपक लाड यांना अश्रू रोखता आले नाहीत.


रणसंग्राम सोशल फाउंडेशनचा वर्धापन दिन  निमित्त आयोजित महिला मेळाव्यासाठी कुंडल व परिसरातील महिला भगिनींच्या मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे संस्थापक  ॲड दिपक लाड व त्यांचे सहकारी यांच्या  सामाजिक कार्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆