BANNER

The Janshakti News

जिल्हा नियोजनचे १२ हजार कोटी खर्च करा अन्यथा तीव्र आंदोलन... वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...




====================================
===================================

सांगली |  दि. १७ जानेवारी २०२२

दि. 14 जानेवारी 2023 रोजी एका वृतपत्रात जिल्हा नियोजनचे 12000 कोटी पडून आहेत अशी  बातमी वाचण्यात आली. एका बाजूला सांगली जिल्ह्यात अनेक विकास कामे ठप्प असून जिल्हा नियोजन मधील निधी हा उपेक्षित घटकावर खर्च करण्यात यावा अशी अपेक्षा आहे मात्र प्रत्यक्ष अनावश्यक कामासाठी निधी खर्च करण्यात येत आहे. तरी हा निधी जिल्ह्यासाठी नियोजित असून ज्या ज्या घटकासाठी हा निधी उपलब्ध झालेला आहे तो त्या त्या घटकासाठी खर्च व्हावा व कोणत्याही परिस्थितीत हा निधी शासनाकडे परत जाऊ नये याची दक्षता घेण्यात यावी.
संपूर्ण 12000 हजार कोटी जे जिल्हा नियोजनकडे पडून आहेत ते संपूर्ण जिल्ह्यात खर्च व्हावेत व खर्च न करता उपेक्षकांना वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती कठोर कारवाई व्हावी म्हणून जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 निधी खर्च न झाल्यास वंचित बहुजन आघाडी मार्फत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, राजू मुलाणी, चंद्रकांत खरात, सतीश शिकलगार नजीर हुसेन झारी, रहीम कवठेकर, दीपक कांबळे अनिल सावंत, प्रकाश बनसोडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆