BANNER

The Janshakti News

वांगीत 89 वर्षे अखंडपणे पारायण सोहळा चालविणारे औंधे कुटुंबीय




======================================
======================================

वांगी /कडेगाव ; दि. २९ जानेवारी २०२३

  वांगी (ता.कडेगाव) :  स्व.राजाराम औंधे यांच्या स्मरणार्थ वांगीच्या औंधे कुटुबियाने 89 वर्षे अखंडपणे पारायण सोहळा चालविला आहे. स्व.राजाराम औंधे यांनी त्यांच्या कार्य काळात पंढरपूर वारी तसेच भजन व कीर्तन कार्यक्रम असे विविध कार्यक्रम वांगी गावात राबविले त्यामुळे, एक विठ्ठलाचा वारकरी यादृष्टीकोनातून त्यांचा सर्वत्र नावलौकिक होता. 
  त्यांच्या पाठीमागे स्व.पंढरीनाथ औंधे वांगीचे माजी सरपंच स्व.रामचंद्र औंधे यांनी ही सेवा अखंडपणे जोपासली होती. आता अलिकडच्या काळात तिसऱ्या पिढीतील वासुदेव औंधे आणी चौथ्या पिढिचे अविनाश औंधे यांनी ही वारकरी सेवेची आणी पारायणाची संस्कृती जोपासली आहे यामाध्यमातून औंधे कुटुंबियांच्या वतीने सात दिवस भजन कीर्तन हरिपाठ सप्ताह व प्रवचन सोहळा असे विविध कार्यक्रम राबवून हा सोहळा पार पाडला आहे. एकीकडे आधुनिकतेचे वारे चालू असताना प्राचीन संत परंपरा जोपासणारे औंधे कुटुंबा बद्दल गावातील वारकऱ्यांच्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
   गावातील वारकरी संप्रदाय मंडळींच्या माध्यमातून या औंधे कुटुंबाला मोठे सहकार्य मिळते त्यामुळे सर्व लोकांना एकत्रित घेवून वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावर घेण्यास औंधे कुटंबीय यशस्वी ठरले आहे

     

गेली अनेक वर्षे आमचे चुलते स्व. पंढरीनाथ औंधे व आमचे वडील स्व. रामचंद्र औंधे हा सोहळा गेली 89 वर्षे अखंडपणे राबवित असुन अलिकडचा काळात आमच्या पिढीने या उपक्रमाची सेवा आपल्या हाती घेतली आहे या माध्यमातून आम्ही वारकरी संस्कृतीचा वारसा जपत असून यासाठी वांगीतील वारकरी संप्रदायाचे मोठे सहकार्य लाभत आहे........ वासुदेव औंधे

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆