BANNER

The Janshakti News

इंग्लिश मीडियम, प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये हळदीकुंकू समारंभ व महिला पालकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन...



=====================================

=====================================

भिलवडी | दि.२९ जानेवारी २०२४

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम, प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये दिनांक 28.1.2023 रोजी माता पालकांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. हळदी कुंकू समारंभाची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. इंग्लिश मीडियम, प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये सुद्धा हा समारंभ एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व मातापालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. आशा गाजी ( स्त्रीरोग तज्ञ सांगली) यांना आमंत्रित केले होते. त्यांनी "आपले आरोग्य आपल्या हाती " या विषयावर खूप सुंदर शब्दांमध्ये माता पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये आरोग्य विषयक विविध गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या. तसेच आई व मुलांमधील नातेसंबंध, आईची जबाबदारी,  संस्कार अशा वेगवेगळ्या विषयांवर  माता पालकांशी आपल्या प्रेमळ व साध्या भाषेमध्ये संवाद साधला.



या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माता पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माता पालकांना हळदीकुंकू व तिळगुळ देऊन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या ज्येष्ठ लिपिक  सौ. संजीवनी जोशी मॅडम होत्या. या कार्यक्रमासाठी जायंट्स ग्रुप सहेलीच्या सेक्रेटरी व सौ. आशा गाजी मॅडम यांच्या सहकारी सौ.स्मिता घेवारे मॅडम उपस्थित होत्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कु.विद्या टोणपे तसेच के.जी व  प्रायमरी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिनाक्षी चौगुले यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ. आदिती देशपांडे यांनी, तर आभार प्रदर्शन सौ. उज्वला हजारे यांनी केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆