BANNER

The Janshakti News

छ्त्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाज पत्रका प्रमाणे झाला पाहिजे या मागणीसाठी मिरज सुधार समितीचे अमरण उपोषण.. वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा...=====================================
=====================================

मिरज | दि. ८ डिसेंबर २०२२

मिरज शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज रस्ता हा कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिला आहे.  खराब रस्त्या व वाहनांची वर्दळ यामुळे रस्त्यावरील मातीची धुळ हवेत पसर असल्याने लोकांना श्वसनाचे विकार होत आहेत. त्याचबरोबर वारंवार अपघात घडत असल्यामुळे या परीसरातील नागरीकांच्या मध्ये प्रशासन व येथील लोकप्रतिनिधी बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. 

हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा यासाठी वारंवार आंदोलने होत आहेत. याच अनुषंगाने मिरज सुधार शहर समिती  यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे.  

या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा महासचिव राजू मुलाणी, जिल्हा प्रवक्ते मनोहर कांबळे, मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार, बाळासो झाडगे आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆