BANNER

The Janshakti News

हर घर बाळासाहब ... सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेचे संस्थापक मा.उमरफारूक ककमरी यांचा उपक्रम ....


=====================================
==============================

सांगली | दि. ०८ डिसेंबर २०२२

आद.ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची प्रतिमा सर्व घरा घरात असावी, या दृष्टिकोनातून समाजातील विविध कार्यक्रमात बहुजन ह्दय सम्राट "आद.बाळासाहेब आंबेडकर" यांच्या हजारो प्रतिमा भेट देण्याचा संकल्प करण्यात आला. 

सुरवात म्हणून वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.ऋषिकेश माने यांच्या नव्याने बांधलेल्या गृह प्रवेश कार्यक्रमात आद.बाळासाहेब आंबेडकर  यांची प्रतिमा भेट देण्यात आली. 

ऋषिकेश माने व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना शुभेच्छा देण्यात आल्या.  

याप्रसंगी, सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेचे संस्थापक मा.उमरफारूक ककमरी यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष मा.अनिल मोरे , जिल्हा उपाध्यक्ष सागर आठवले,जिल्हा सदस्य अनिल अंकलखोपे,हिरामण भगत,शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम,बांधकाम कामगार संघटनेचे राज्यध्यक्ष संजय कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष मानतेश कांबळे, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆