BANNER

The Janshakti News

ब्रह्मनाळ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक : जितसिद्ध ग्राम विकास परिवर्तन पॅनेलचा जोरदार शक्ती प्रदर्शनात प्रचाराचा शुभारंभ..





                      📲 व्हिडीओ पहा 📲
                                   ⏬


======================================
======================================

ब्रम्हनाळ | दि. ०९ डिसेंबर२०२२

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचे जोरदार पडघम वाजू लागले आहेत. आज दिनांक ०९ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वपक्षीय असलेले जितसिद्ध ग्राम विकास परिवर्तन पॅनेलचा प्रचार शुभारंभ भव्य शक्ती प्रदर्शनाने करण्यात आला.



 यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार गीता गायकवाड यांच्या सह  इतर उमेदवार  संतोष गावडे, बाळासो गावडे ,सचिन पाटील, राजेंद्र कारंडे, सुरेखा माधवांना शोभा पाटील, सुजाता राजोबा नीलम बंडगर, सुनीता चौगुले, स्वप्नाली वडेर यांनी गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले.

  ब्राम्हनाळ ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या निमित्ताने ब्रम्हनाळ मध्ये गाव पातळीवर दोन पॅनेल निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. जितसिद्ध ग्राम विकास परिवर्तन पॅनेलच्या आजच्या या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे हि निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली गेली आहे.


 या निवडणुकीत महापुरामुळे नुकसान होऊन सुद्धा शासनाकडून पूरग्रस्त अनुदान मिळालेले नाही तसेच पुन्हा एखादी बोट दुर्घटना होऊ नये यासाठी गावातून बाहेर पडण्यासाठी भरावा घालून भिलवडी स्टेशन रस्ता तसेच मारुती मंदिरा जवळ येरळा नदीवर पूल तसेच पानंद रस्ते गावांतर्गत रस्ते व पायाभूत नागरी सुविधा व इतर मुद्दे प्रामुख्याने प्रचारामध्ये घेतले जात आहेत.

 या निवडणुकीत जितसिद्ध ग्रामविकास परिवर्तन पॅनेलला गावातील वाढता प्रचंड प्रतिसाद पाहता जितसिद्ध ग्रामविकास परिवर्तन पॅनेल हे ब्रम्हनाळ मध्ये परिवर्तन घडविणार असे जनतेतून बोलले जात आहे.


 त्याचप्रमाणे जितसिद्ध ग्रामविकास परिवर्तन पॅनेलला मतदारांनी आर्थिक ताकद देण्याच्या उद्देशाने एक नोट एक वोट या माध्यमातून आर्थिक मूर्तीचा ओघ सुरू झाला आहे.

 या प्रचार शुभारंभ प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा , भोपाल कर्नाळे , अशोक पाटील ,  शिवाजी गडदे , तात्यासाहेब वडेर , मोहन शिनगारे , संजय पाटील , अनिल राजोबा , हनुमंत विभूते , प्राध्यापक सर्जेराव गायकवाड , तुकाराम बंडगर , आनंदा कारंडे , विजय शिंदे , अकाराम गावडे , प्रकाश चौगुले , दिलीप मुळाज , गजानन वावरे , सिध्दकुमार वडेर , आण्णासो गावडे , सुदर्शन माधवांना , हेमंत जगदाळे , प्रशांत बंडगर , दिलीप चौगुले , गौतम लोटे , प्रकाश लोटे , बाबासो सनदी , संतोष मोळाज , संतोष राजोबा , सुहास राजोबा , वर्धमान राजोबा , अक्षय पाटील यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  



या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुभाष वडेर यांनी केले तर प्रशांत बंडगर यांनी आभार मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆