BANNER

The Janshakti News

अंकलखोप आणि सावंतपूर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सद्स्यांचा कुंडल येथे सत्कार...
======================================
======================================

कुंडल | दि. 28 डिसेंबर 2022

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी भविष्यात जनतेला अभिमान वाटावा असे काम करा, कसलीही मदत लागली तरी आम्ही आहोत अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी दिली.

ते कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू सहकारी साखर कारखाण्यावर सावंतपूर आणि अंकलखोप येथील नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते.

यावेळी अंकलखोप सरपंच राजेश्वरी सावंत, सदस्य नवनाथ पाटील, प्रवीण विभूते, सुनीता कुंभोजकर, नंदिनी लांडगे, जयश्री सूर्यवंशी, विकास पाटील, माणिक चौगुले यांचा तर सावंतपुरच्या विजय सावंत, ज्योती देवकाते, पूनम घाडगे, मंगेश मोटे, मनीषा माने, तरन्नुम मुलानी, विकास जाधव, उज्वला सावंत, अनिता खंबाळे, अनिल सावंत, शशिकांत गोरड या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अंकलखोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या सहकार्यामुळेच आम्ही यश संपादन करू शकलो, भविष्यात ही हातात हात घालून जनसेवा करू.

यावेळी श्रीधर जाधव, अनिल सावंत, शीतल बिरनाळे, सतीश पाटील, श्रीधर नवले, मोहन पाटील, पोपट आवटे, विनोद सूर्यवंशी, सचिन जाधव, राहुल जाधव, रामचंद्र सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कुंडल ता. पलूस येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या समाधीचे दर्शन घेताना अंकलखोप आणि सावंतपुर सदस्यांसह शरद लाड, नितीन नवले, गणपतराव सावंत, शामराव नवले, विश्वनाथ मिरजकर आदि.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆