BANNER

The Janshakti News

तासगाव मधे कॅफेच्या नावाखाली मिनीलॉज सुरु... तात्काळ पोलीस प्रशासनाने कारवाई करावी... अन्यथा मनसेच्या स्टाईलने डायरेक्ट खळखट्याक करू .. दिपाली पूंडेकर ,




➡️                  *व्हिडीओ पहा*
                                  👇





======================================
======================================

तासगाव दि. 27 डिसेंबर 2022
(कार्यकारी संपादक - सचिन टकले)

तासगाव शहरातील कपल कॅफे प्रेमी युगुलांचे अड्डे बनले आहेत. हे कॅफे बंद करण्याचे नोटीसही तासगाव पोलीस ठाण्याकडून देण्यात आले होते. मात्र तरीही अनेक ठिकाणी खुलेआम कॅफे सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई केल्या दोन दिवस बंद राहतात नंतर आहे तसे चालू होतात .ह्यामुळे अल्पवयीन मंडळी कॅफेवर जाऊन आपले शौक पूर्ण करतात. सविस्तर माहिती अशी की, तासगाव शहरातील प्रत्येक गल्ली- बोळात अनेक कपल कॅफे सुरू आहेत. ह्या विषयावरती मनसे तासगाव तालुका महिला अध्यक्षा दीपाली  पूंडेकर  यांनी   


जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली ह्यांना निवेदन दिले. पुंडेकर म्हणाल्या, या कॅफेवर पोलीस नगपलिका अथवा अन्न आणि औषध प्रशासनाचे कसलेही नियंत्रण नाही, कॅफे चालक हफ्ते देऊन प्रशासनाला खिशात टाकल्याच्या आविर्भावात आहेत. सरासर तासगाव मधे कॅफेच्या नावाखाली मिनीलॉज चालू आहेत.  कॅफेमधे बेकायदेशीर पार्टीशन आहेत ते  काढले पाहिजेत अशी सर्व जनतेची मागणी आहे. पुढे पुंडेकर म्हणाल्या, जर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कॅफे वरती कारवाई नाही केली तर आम्ही मनसेच्या वतीने खळखट्याक करू. 
यावेळी मनसे तासगाव तालुका शहर उपाध्यक्षा रोशनी जावळेसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆