BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरती कंपोष्ट खत विक्रीचा शुभारंभ..

कारखाना क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना मागणीनुसार उधारीवर , बिनव्याजी बांधावर पोहोच मिळणार.... शरद (भाऊ) लाड
======================================
======================================

कुंडल | दि. 29 डिसेंबर 2022

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाण्यात तयार होणा-या क्रांती कंपोस्ट खत विक्रीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांचे हस्ते झाला.

कारखाना कार्यक्षेत्रात ऊस हे प्रमुख बागायत पिक आहे. या पिकाचे लागवडीतील सातत्य,फेरपालटीचा अभाव, सेंद्रीय खताचा घटलेला वापर व हवामानातील बदल यामुळे जमिनीची सुपिकता घटत आहे. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताच्या वाढीव प्रमाणात सेंद्रीय खताचा वापर होताना दिसत
नाही. त्याचप्रमाणे उत्तम प्रतिची सेंद्रीय खते योग्य किंमतीमध्ये उपलब्ध होत नाहीत. ऊस शेतीमध्ये सेंद्रीय खताचा वापर वाढावा व जमिनीची सुपिकता टिकून रहावी म्हणून कारखान्यामार्फत ऊसविकास योजनेतून अनेक उपक्रम राबविले जातात. यामध्ये ७५ टक्के अनुदानावर ताग/धैंचा बियाणाचा पुरवठा, गांडुळ खताचा पुरवठा, जिवाणू खताचा पुरवठा तसेच ऊस तोडणीनंतर पाचट आच्छादनाला प्रोत्साहन देणे या बाबींचा समावेश आहे. कारखानामध्ये तयार होणा-या प्रेसमडवर संस्कार करून उत्तम पध्दतीचे कंपोष्ट खत तयार केले जाते व हे खत शेतक-यांना बांधपोहोच, बिनव्याजी व उधारीने पुरवठा केले जाते. सर्व शेतक-यांना याचा लाभ मिळावा म्हणून एकरी १० मे. टन या प्रमाणात मागणीप्रमाणे कंपोष्ट खताचा पुरवठा केला जात असल्याचे शरद लाड यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक अंकुश यादव,अरूण कदम, संदीप पवार, जयप्रकाश साळुंखे, कुंडलिक थोरात सचिव आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊसविकास अधिकारी विलास जाधव, वाहतूक कंत्राटदार किरण गावडे, सचिन घाटगे, संपतराव लाड, माणिक पवार, दिनकर सव्वाशे, कारखान्याचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरती कंपोष्ट विक्रीचा शुभारंभ करताना शरद लाड.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆