BANNER

The Janshakti News

पलूस - कडेगांव मतदारसंघातील जनतेने मतदानरुपी आमच्यावर व काँग्रेस पक्षावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरवू.. ..... आ. डॉ.विश्वजित कदम
=====================================
=====================================

भिलवडी | दि. २४ डिसेंबर २०२२

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पलूस - कडेगांव मतदारसंघातील जनतेने मतदानरुपी काँग्रेस पक्षावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरवण्याचे काम आम्ही सर्व कदम कुटूंबीय करू अशी ग्वाही माजी मंत्री , पलूस-कडेगाव विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी दिली.
सध्या हिवाळी अधिवेशन असल्याने ते नागपुरात आहेत. तेथूनच त्यांनी काँग्रेसचे लोकनियुक्त सरपंच व विजयी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ.कदम म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन सामान्य माणसात वातावरण चांगले झाल्याचे स्पष्ट होते. एक चांगला संदेश या मतदारसंघातील लोकांनी दिला आहे. पायाला भिंगरी बांधून पळणाऱ्या गावातील नेते, कार्यकर्ते व मतदार आणि उमेदवार यांचे जाहीर आभारही मानले.
ते पुढे म्हणाले, मी या मतदारसंघाचे अडीच वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. कोणाला कशाचीही कमी पडून देणार नाही याची ग्वाही मी जनतेला दिली आहे. डॉ.पतंगराव कदम साहेबांचा विचार घेऊन व मोहनशेठ दादांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात ही विकासाची गाथा अशीच पुढे चालू ठेवू.
पलूस कडेगांव या दोन्ही तालुक्यात काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय झाला असून येथे डॉ.विश्वजित कदम यांची पकड घट्ट असल्याचे सिद्ध तर झालेच शिवाय त्यांचा करिष्मा कायम असल्याचे जाणवते. पलूस तालुक्यात ९ तर कडेगांव तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद काँग्रेसकडे राहिले आहे.
आठवण साहेबांची
स्व. डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या विचारांचा पलूस कडेगांव मतदारसंघ आहे. तो तसाच राहणार आहे आणि यापुढेही राहील असा विश्वासही डॉ.विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆