=====================================
नवी दिल्ली | दि. 22 डिसेंबर 2022
जगभरात खेळला जाणारा कराटे हा चांगला खेळ असून महिलांना आत्मरक्षणासाठी महत्वाचा खेळ आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी व्यक्त केले.
त्यागराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल दिल्ली येथे खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धा उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राष्ट्रीय सुपर गोल्ड मेडल कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
यावेळी खा रामदासजी आठवले युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेश भंडारे, सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेते सुमन तलवार, दिल्ली येथील माजी आमदार कमांडो सुरेंद्र सिंग, युथ फाउंडेशनच्या फाऊंडेशन उपाध्यक्ष निधी ठाकूर, विनीत, राम कव्हर, रवि दत्त, ब्रिजेश, शक्ती खटाणा, मनीष
लखन कुंतल , पियुष कोहली, सूत्रसंचालन आशुतोष खटाना,तुषार, शिवकुमार आदी प्रमुख उपस्थित होते.
या स्पर्धसाठी देशभरातून निमंत्रित केलेल्या दोन हजार कराटेपट्टूनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे संयोजन फाऊंडेशन उपाध्यक्ष निधी ठाकूर, विनीत, राम कव्हर, रवि दत्त, ब्रिजेश कुमार, शक्ती खटाणा, मनीष कुमार, लखन कुंतल , पियुष कोहली, तुषार, शिवकुमार, रवि यांनी अथक प्रयत्न केले.यावेळी स्वागत प्रास्ताविक फाउंडेशन चे अध्यक्ष संदेश भंडारे यांनी केले तर सूत्रसंचालन आशुतोष खटाना यांनी केले. शेवटी आभार ब्रिजेश कुमार यांनी मानले.◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे उदघाट्न करताना केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले, सोबत संस्थेचे अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे व इतर पदाधिकारी