BANNER

The Janshakti News

चोपडेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत माने यांचा जिल्हा परिषद सदस्य शरद (भाऊ) लाड यांच्या हस्ते सत्कार...
====================================
====================================

कुंडल | दि. २१ डिसेंबर २०२२

पलूस-कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसने मारलेली मुसंडी म्हणजे, आम्ही केलेल्या कामाची पोहोच पावतीच आहे, यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही तालुक्यात विकास कामातून शक्षम फळी उभा करेल असे मत आमदार अरुणअण्णा लाड यांनी व्यक्त केले. ते ग्रामपंचायतींच्या निकालानंतर बोलत होते.

आमदार लाड म्हणाले, आम्ही पलूस तालुक्यात १०४ जागांवर स्वतंत्र निवडणूक लढवली होती त्यातील ३८ जागा आम्हाला बहुमताने जिंकता आल्या आणि दोन गावांत सरपंच पदाचा उमेदवार ही निवडून आला आहे, याबरोबरच अंकलखोप येथे भाजपा आणि राष्ट्रवादीचा सरपंच, सावंतपुर आणि खटाव येथे काँग्रेस राष्ट्रवादीचा सरपंच तर ब्राम्हणाळ येथे काँग्रेस विरोधात सर्वपक्षीत सरपंच निवडून आणण्यात यश आले आहे.

तसेच कडेगाव तालुक्यात, ९८ जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी २३ जागा निवडून आणण्यात आम्हाला यश आले आहे, कडेगाव तालुक्यातील हे आमचे दुसरे मोठे यश असून तेथील कार्यकर्त्यांच्या फळीने केलेल्या कामामुळेच हे शक्य झाले आहे.

गटातटाच्या पलीकडे जाऊन आम्ही यावेळी निवडणुकीला सामोरे गेलो होतो यावेळी राष्ट्रवादीने ज्या ज्या ठिकाणी सदस्य उभा केले त्यातील बहुतांश निवडून आले आहेत.

मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आणि समाधानी असून यापूढेही सामाजिक कार्यातून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहण्याची खात्री त्यांनी यावेळी दिली.

क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरती चोपडेवाडी (ता पलूस) येथे सरपंच पदी निवडून आलेल्या प्रशांत माने यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, किरण लाड आदि.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆