BANNER

The Janshakti News

नागठाणे येथील ऊस वाहतूकदाराची फसवणूक करुन तीन लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या मुकादमला भिलवडी पोलिसांनी केली अटक.. आरोपी कडून तीन लाख रु. हस्तगत...




======================================
======================================

भिलवडी | दि २० डिसेंबर २०२२

ऊसतोडणी मुकादम याने पलूस तालुक्‍यातील नागठाणे येथील एका ऊस वाहतूकदाराला ऊसतोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून तीन  लाखांची फसवणूक केली होती. याबाबत भिलवडी पोलिस ठाण्यात संबंधित मुकादमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

याबाबतची भिलवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पलूस तालुक्‍यातील नागठाणे येथील  गणपत शिवाजी मांगलेकर हे साखर कारखान्याला ऊस वाहतूक करतात.  त्यांना प्रशांत नागोराव काळे वय २६ वर्ष, व्यवसाय- मुकादम, रा. राजंणा, पो.भंडारी, ता. पुसद, जि.यवतमाळ यांने  तुम्हाला ऊस तोड सिजन २०२१/२२ करीता मजूर / कामगार जोडया पुरवितो असे सांगून गणपत शिवाजी मांगलेकर यांच्याकडून वेळोवेळी ३,०००००/-  रुपये उचल घेतली होती. 
हा संपूर्ण प्रकार चालू गळीत हंगामाच्या कालावधीत घडला आहे.
  
दरम्यान,मुकादम नागोराव काळे यांनी मांगलेकर यांना ऊसतोडणीसाठी मजूरही पुरवले नाहीत. त्यामुळे मांगलेकर यांनी मुकादम नागोराव काळे याच्या विरोधात भिलवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्या विरोधात कलम ४२०, ४०६, ५०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
        
   श्री. बसवराज तेली भा.पो.से. पोलीस अधीक्षक , सांगली, श्रीमती आचल दलाल भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक , सांगली तसेच श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी , तासगांव यांचे मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याचे सापोनि कैलास कोडग यांच्या सुचनेप्रमाणे भिलवडी पोलिसांनी आरोपी नागोराव काळे याचा शोध घेऊन सदर गुन्हयाच्या अनुशंगाने त्याची कसून चौकशी  केली असता त्यांने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याचेकडून पोलिसांनी एकूण ३००००० /- रुपये हस्तगत  केले.
  
   भिलवडी पोलिसांनी आरोपी नागोराव काळे याला दि. १९ डिसेंबर २०२२  रोजी  कोर्टात हजर केले असता कोर्टाच्या आदेशान्वये पोलिसांनी हस्तगत केलेली रक्कम फिर्यादी ऊसवाहतूकदार  गणपत शिवाजी मांगलेकर यांच्या ताब्यात देणेत आली आहे.
सदरची कारवाई भिलवडी पोलीस ठाण्याचे 
सापोफौ मोरे व विशाल पांगे यांनी केली आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆