BANNER

The Janshakti News

शालेय जीवनापासूनच मुलांना खेळाची आवड निर्माण करणे ही गरजेची गोष्ट आहे.. ....पोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे




====================================
==============================

पलूस | दि. २४ डिसेंबर २०२२

 मानवी आयुष्य हे विविध कलाकृतींनी भरलेले असून त्यात खेळाला असाधारण महत्व आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच मुलांना  खेळाची आवड निर्माण करणे ही गरजेची गोष्ट असल्याचे प्रतिपादन पलूस पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक बाजीराव वाघमोडे यांनी आज पलूस येथे केले. जिल्हा परिषद शाळांच्या पलूस केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 


अध्यक्षस्थानी इस्लामपूर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोकराव जाधव होते.तर सभा मंचावर पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण, जिल्हा परिषद शाळा नं.२ च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्वला पाटील, शिक्षक बँकेचे संचालक अमोल माने व नितीन चव्हाण, शिक्षक नेते बाबासाहेब लाड,,मारुती शिरतोडे व इतर मान्यवर होते. यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे म्हणाले माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्तीला फार महत्त्व आहे. आणि त्याची सुरुवात शालेय जीवनातील खेळापासून होते. खिलाडू वृत्तीचा कोणताही माणूस यश अपयश सहज पचवणारा असतो त्यामुळे खेळ आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात.मुलांनो आपल्या भारतातील अनेक खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून आपले नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन देशाचा गौरव केला आहे.त्यामुळे तुम्ही अभ्यासाबरोबरच आवडीच्या खेळात तरबेज बना असे आवाहन केले.तर पोलीस उपनिरीक्षक अशोकराव जाधव यांनी गेल्या 38 वर्षाच्या आपल्या पोलीस दलातील  सेवेचे अनुभव सांगताना खेळामुळेच मी पोलीस दलात उत्तम कामगिरी करू शकलो असे प्रतिपादन केले.


या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार अमोल माने यांनी मानले.स्पर्धा प्रमुख बाळासाहेब खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळातील आठ खेळ प्रकारांतील बहात्तर विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक खेळाडू उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
    
    

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆