BANNER

The Janshakti News

वांगीत ५ जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव=====================================
=====================================

वांगी | दि. १८ नोव्हेंबर २०२२

वांगी (ता. कडेगांव) परिसरात जनावरांना "लम्पी" या आजाराचा प्रादुर्भाव झाला असल्याने पशुपालक भयभीत झाले आहेत. एकूण ५ गायींना हा आजार झाला असून, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शंकरराव भाळे उपचार करीत आहेत. कडेगांव तालुक्यात गायवर्गीय १८ हजार जनावरे तर म्हैसवर्गीय ३८ हजार जनावरे आहेत. या सर्व जनावरांचे "लम्पी" प्रतिबंधक लसिकरण तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शंकरराव भाळे यांच्या नियोजनाखाली महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. तरीही वांगीतील खरकटवाडी परिसरातील रत्नराज सुरेश जाधव यांच्या दोन गायींसह अन्य तीन शेतक-यांच्या तीन गायींना लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. अंगावर गाठी येणे व पाय सुजणे हि लक्षणे असून सदर जनावरे उपचाराखाली आहेत. इतर ठिकाणचा अनुभव पाहता जनावरे दगावण्याच्या भितीने हे शेतकरी चिंतातूर आहेत. या आजाराचा फैलाव होण्याच्या भितीने सर्वच पशुपालक भयभीत झाले आहेत. प्रतिबंधक लस टोचूनही कसा काय प्रादुर्भाव झाला ? हि चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. साखर कारखान्यावर ऊस वाहतुकीसाठी आलेल्या बैलजोड्यामुळे हा फैलाव झाला असावा. अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆