BANNER

The Janshakti News

माळवाडी येथे एका अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या...



===================================================================

भिलवडी | दि. १८ नोव्हेंबर २०२२

दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी सुमारे १.५६ वा. माळवाडी      ( ता. पलूस ) येथील एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये एका ५० वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

संबधित व्यक्तिचे नाव मोहन वय वर्षे ५० असल्याचे समजते. त्याचे वर्णन बांधा मध्यम , उंची पाच फूट सात इंच ,   रंग गव्हाळ , आकाशी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट , फिकट निळ्या रंगाची जीन्स फिकट , डावे बाजूला खाली कमरेच्या वर जुना भाजलेला गोलाकार व्रण ,
गोदन - इंग्रजीत जोडून MR अक्षर असे आहे. त्याचे पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही.



सदर घटनेची नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत.


सदर व्यक्तिस सध्या बेवारस समजून,पलूस येथील शवगृहात ठेवण्यात आले आहे.सदर व्यक्ति विषयी कोणास काही समजल्यास अथवा या वयाची एखादी व्यक्ती हरवली असल्यास भिलवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा ( फ़ोन नं. 02346 237233 ) असे आवाहन भिलवडी पोलिसांनी केले आहे.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■






■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■