BANNER

The Janshakti News

चाकूचा धाक दाखवून शेतकरी महिलेची लूट..

 

====================================
====================================

वांगी | दि. १९ नोव्हेंबर २०२२

  देवरष्ट्रे ता.कडेगाव येथील महिलेची अज्ञात इसमाने चाकूचा धाक दाखवून अंगावरील दागिने लुटून नेली आहेत.

याबाबत चिंचणी वांगी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवार दि.१७ रोजी सुरेखा नितीन मोरे वय वर्षे ३८ रा. देवरष्ट्रे ही महिला ११.३० वाजनेचे सुमारास त्यांच्या लंबर नावच्या शेतात भेंड्या तोडण्याचे काम करत असताना अंदाजे ३० ते ३२ वर्षे वयाचा तरूण मोटरसायकलवरून त्याठिकाणी आला त्याने सदर महिलेला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले असा ४१,००० रू किमतीचे दागिने लुटून नेली आहेत. तसेच तो तरूण नंतर रामापूर गावच्या दिशेने मोटरसायकलवरून गेला.
सदर घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर घटनेची पोलिसांत फिर्याद दाखल असून महिलेने सांगितल्याप्रमाणे त्या चोराचे वर्णन पुढीलप्रमाणे, वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे, सावळ्या रंगाचा नाक्याला उंच्याला अंगात काळ्या रंगाचे ज्याकेट काळ्या रुमालाने तोंड बांधले होतें.
सदर चोराचा शोध  घेवून लवकरात लवकर या घटनेचा तपास पूर्ण व्हावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■