BANNER

The Janshakti News

दुधोंडीत आरपीआयच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ........................….................... सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचा वापर करणार : विशाल तिरमारे



=====================================
=====================================

पलूस | दि. १९ नोव्हेंबर २०२२

दुधोंडी (ता.पलूस ) येथे दि.१३ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे विभागीय कार्यालय दुधोंडी येथे मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले.



रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्याक्ष विवेकरावजी कांबळे यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे यांच्या संकल्पनेतून दुधोंडी येथे सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात आले.शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या उद्देशाने कार्यालय सुरू करण्यात आल्याचे आरपीआयचे विशाल तिरमारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितले.


यावेळी बोलताना विवेक कांबळे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आदर्श वाटावा अशाप्रकारचे कार्यालय विशाल तिरमारे यांच्या माध्यमातून दुधोंडी येथे सुरू करण्यात आले याचे समाधान आहे. भारतीय राज्यघटनेत दिलेले मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी कार्यालयाचा वापर व्हावा.केंदीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ मजबूत करण्यासाठी युवक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, राजकारणापेक्षा जास्तीत जास्त सामाजिक कार्य जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून घडो अशा प्रकारच्या शुभेच्छा व सूचना माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांनी दिल्या.


यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात,लोकसभा अध्यक्ष संदेश भंडारे,जे.के.बापू जाधव, शिवाजीराव मगर-पाटील, बोधिसत्व माने यांची भाषणे झाली.




यावेळी रिपब्लिकन पक्षाचे आय टी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे,विशाल काटे,तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे, कडेगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र सोरटे, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष तुषार लोंढे,नवनीत लोंढे, जिल्हा उपाध्याक्ष संजय मस्के,लोकसभा उपाध्यक्ष बाळासाहेब झेंडे,खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कांबळे,पलूस कडेगाव विधानसभा उपाध्यक्ष शीतल मोरे,युवक पलूस तालुका अध्यक्ष आविराज काळीबाग,माजी खानापूर तालुका अध्यक्ष दिनकर धेंडे,हणमंत खिलारे,क्रांतिकुमार जाधव, जयवंत मगर-पाटील,जगदीश तिरमारे, मनोज तिरमारे, अजिंक्य तिरमारे,प्रशांत आरबुने, दुधोंडी शाखा अध्यक्ष वैभव तिरमारे, भीमशक्ती ग्रुपचे अध्यक्ष अक्षय तिरमारे, निलेश तिरमारे सांगली जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे व दुधोंडी गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆