BANNER

The Janshakti News

समर्थ प्रशिक्षण केंद्रात ज्योती पाटील व सोमेश्वरी फंड प्रथम ...............................................समर्थ प्रशिक्षण केंद्र जत चा शंभरटक्के निकाल



=====================================


=====================================

जत | दि. १९ नोव्हेंबर २०२२

महा व्यवसाय शिक्षण डिजिटल ऑनलाइन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था संचालित समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र जत या केंद्रात ऑक्टोबर 2022 मध्ये घेतलेल्या अंगणवाडी सुपरवायझर व मोंटेसरी शिक्षिका या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून समर्थ प्रशिक्षण विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेत

                                 ज्योती पाटील 
ज्योती पाटील यांचा 82.75.% गुण मिळवून व मोंटेसरी शिक्षिका सोमेश्वरी फंड यांचा 82.75.% विशेष योग्यता श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला व रेखा भडंगे या 78.75.% गुण मिळवून विशेष योग्यता श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
                             सोमेश्वरी फंड

समर्थ प्रशिक्षण केंद्रात अंगणवाडी शिक्षिका ,सुपरवायझर, अंगणवाडी मदतनीस, पत्रकारिता, ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग, शिवणकाम या विषयाच्या अध्यापनाचे कार्य होत असते. प्रशिक्षण केंद्राची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. 

यामध्ये योग्य मार्गदर्शन व प्राध्यापकाचे अध्यापन कौशल्य याचाही मोठा सहभाग आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे, प्राचार्य संध्या कांबळे,सहशिक्षिका नयना सोनवणे,सोनिया कांबळे,सुनीता भुसनुर संस्थेचे उपाध्यक्ष महेश दत्तू,सचिव प्रमिला साळुंखे,खजिनदार मेघश्याम सुरवसे,संचालक इकबाल पाटील,शरदचंद्र पवार,लता पाटील यांचेसह पालकांनी यशाबद्दल अभिनंदन केले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆