BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या पुण्यतिथी निमित्त कुंडल येथे विविध ठीकाणी आदरांजली



=====================================
=====================================

कुंडल | दि.१४ नोव्हेंबर २०२०

प्रतिसरकारच्या चळवळीचे फिल्डमार्शल, क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या पुण्यतिथी निमित्त कुंडल (ता पलूस) येथे विविध ठीकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत कुंडल, क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड महाविद्यालय, प्रतिनिधी हायस्कूल, क्रांती इंटरनॕशनल पब्लिक स्कूल, क्रांती दुध संघ, क्रांती गारमेंट, गणेशवाडी, सत्येश्वर, बसवेश्वर पाणीपुरवठा संस्था,कुंडल विकास सोसायटी, व अन्य सर्व संस्थामध्ये स्वर्गिय क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंना आदरांजली वाहनेत आली.

यावेळी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख आमदार अरुण लाड म्हणाले की, स्वर्गिय बापूसाहेबांनी कष्टकरी, शेतकरी, कामगारवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम केले होते , त्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेच परंतू स्वातंत्यानंतर ही सतत कष्टकरी,शेतकरी व कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी झटत राहीले .

सर्वसामान्य , गोरगरीब जनतेला स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये सुखासमाधानाने रहाता यावे याचाच विचार त्यांनी नेहमी केला. शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, कष्टकरी वर्गाला त्याच्या कामाचे योग्य दाम मिळाले पाहिजे व बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले पाहीजे , कोणीही लाचार राहु नये या हेतूनेच क्रांती सह. साखर कारखान्याची उभारणी त्यांनी केली. आज त्यांच्याच आदर्शावर वाटचाल करत असतान शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देऊन त्यांच्या अपेक्षाची पुर्तता आम्ही करत आहोत.

यावेळी क्रांती दुध संघाचे अध्यक्ष किरण लाड , दिलीप लाड, जि. प. सदस्य शरद लाड, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत लाड, भीमराव माने, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, रत्नदीप लाड,
रणजित लाड, विक्रांत लाड, नितीन नवले, पृथ्वीराज कदम, कुंडलिक एडके, सुमनताई गायकवाड, कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, क्रांती कारखाण्याचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद, जी डी बापूंच्या विचारांचे पाईक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

क्रांतिअग्रणी स्व. डाॕ. जी.डी. बापू लाड यांना क्रांती कारखाना कार्यस्थळावरील समधीस्थळी अभिवादन करताना आमदार अरुण लाड, किरण लाड, शरद लाड व मान्यवर .

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■





■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■